पुणे

पुण्यात दामिनी, बीट मार्शल अ‍ॅक्शन मोडवर!

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : तोडफोड, गोळीबार आणि विद्यार्थिनीवर प्रेम प्रकरणातून कोयत्याने मध्यवस्तीत झालेल्या हल्ल्याची पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी गंभीर दखल घेतली आहे. यापुढे असे प्रकार घडू नयेत म्हणून प्रतिबंधात्मक कारवाईबरोबरच पोलिसांचा रस्त्यावरील वावर कसा वाढेल, याकडे लक्ष दिले जात आहे. दामिनी पथकांना अ‍ॅक्टिव्ह करण्यात आले असून, शस्त्रधारी बीट मार्शलची संख्या वाढविण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे आणि क्लासेस परिसरात दामिनी पथके तैनात केली आहेत. शनिवारी विश्रामबाग आणि फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शल आणि दामिनी पथकांनी रुट मार्च काढून संचलन केले.

शहरातील मोक्याच्या ठिकाणी रात्रीबरोबर दिवसादेखील नाकाबंदी करण्यात येणार आहे. ओला, उबेर, रिक्षांची तपासणी करण्यात येणार आहे. प्रत्येक गुन्हेगारांवर नजर ठेवली जात असून, अल्पवयीन गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, दामिनी आणि बीट मार्शलची संख्या वाढण्यात आली असून, शाळा, कॉलेज, मॉल्स, महिला वसतिगृह नियमितपणे गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी गुंड, गँगस्टर ज्या भागात राहतात त्या भागात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येणार आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT