Pune Traffic No Parking Zone
पुणे: गर्दीच्या काळात वाहनांची कोंडी होऊ नये यासाठी सायंकाळी ५ नंतर सर्व प्रकारच्या वाहनांना पार्किंग करण्यास सक्त मनाई करण्यात आली असल्याची माहिती वाहतूक विभागाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.
येथे असेल नो पार्किंग
- शिवाजी रोड : जिजामाता चौक ते मंडई चौक, मंडई परिसर : मंडई ते शनिपार चौक, बाजीराव रोड : शनिपार चौक ते फुटका बुरुज, अप्पा बळवंत चौक : अप्पा बळवंत चौक ते मोती चौक, टिळक रोड : एस. पी. कॉलेज मुख्य प्रवेशद्वार ते टिळक चौक, शास्त्री रोड : सेनादत्त पोलिस चौकी ते टिळक चौक एकेरी वाहतुकीच्या नियमांत तात्पुरती शिथिलता.
नागरिकांची आणि पादचाऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन कुमठेकर रस्ता, सदाशिव पेठ, फडके हौद रस्ता, नाईक रस्ता आणि एम. जी. रोड परिसरातील एकेरी वाहतुकीचे नियम आवश्यकतेनुसार सायंकाळी ५ नंतर तात्पुरत्या स्वरूपात शिथिल केले जातील.
फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका आणि पोलिस वाहने यांसारख्या अत्यावश्यक सेवेतील वाहनांना बंद रस्त्यांवरून प्रवेशासाठी पूर्ण सूट देण्यात आली आहे.