पुणे : पुढारी वृत्तसेवा : उरुळी देवाची, फुरसुंगी ही गावे 2017 मध्ये महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. समाविष्ट गावांमध्ये अजूनही रस्ता, पाणी, कचरा डेपो या समस्या सुटलेल्या नाहीत. दुसरीकडे, कर आकारणी मात्र दुप्पट करण्यात आली आहे. याचा निषेध करण्यासाठी 11 डिसेंबर रोजी 'रास्ता रोको' आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हवेली तालुका शाखेच्या वतीने प्रशांत भाडळे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. एका महिन्यात समस्यांचे निराकरण न झाल्यास हजारो लोक महापालिकेला घेराव घालणार असल्याचेही सांगण्यात आले.
भाडळे पाटील म्हणाले, 'महापालिकेत समाविष्ट झालेल्या उरुळी देवाची आणि फुरसुंगी या गावांवर सुरुवातीपासून अन्याय झाला आहे. कचरा डेपो आल्याने पाण्याचे स्रोत खराब झाले असून, जीवनमान धोक्यात आले आहे. गावकरी शहराचा कचरा सहन करीत आहेत. कर आकारणीही दुप्पट करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत महापालिकेने विशेष अॅक्टखाली सुविधा पुरवाव्यात आणि विकासकामांसाठी तातडीने आर्थिक तरतूद उपलब्ध करून द्यावी.'
हेही वाचा