पुणे

Pune News : टपाल तिकिटांमधून उलगडला भारतीय वारसा

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारतीय डाक विभागातर्फे जिल्हास्तरीय टपाल तिकिटांचे प्रदर्शन 'पुणे-पेक्स 2023' बालगंधर्व कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी यांच्या हस्ते झाले. हे प्रदर्शन 7 डिसेंबरपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व पुणेकरांसाठी खुले राहणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या 'मॉडर्न हायस्कूल ते बालगंधर्व रंगमंदिर फिलाटेली वॉक'ने करण्यात आली. या वॉकमध्ये मॉडर्न हायस्कूलच्या मुख्याध्यापिका फुलारी तसेच मॉडर्न गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका नाईक, पुणे प्रादेशिक विभागाचे जनरल पोस्टमास्टर आर. के. जायभाये, अधीक्षक डाकघर बी. पी. एरंडे, वरिष्ठ पोस्टमास्तर अविनाश पाखरे सहभागी झाले होते.

प्रदर्शनाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पुणे प्रदेशचे पोस्टमास्टर जनरल आर. के. जायभाये होते. याशिवाय राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. आशिष लेले, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे भूपाल पटवर्धन, मराठा चेंबर्स ऑाफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष दीपक करंदीकर, सिमरन कौर, पोलिस आयुक्त संदीपसिंग गिल उपस्थित होते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था आणि ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालय पुणे या दोन संस्थांवर विशेष आवरणांचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. तसेच पुण्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या दहा वास्तूंवर पिक्चर पोस्ट कार्डचे प्रकाशन करण्यात आले.

डॉ. आशिष लेले यांनी फिलाटेलीचा छंद व सोशल मीडिया पोस्ट याची तुलना करताना फिलाटेली हे झाडाचे खोड तर सोशल मीडिया पोस्ट ही पानगळ होणारी पाने, असे सांगितले. इंटरनॅशनल कलेक्ट्रर्स सोसायटीचे अध्यक्ष किशोर चांडक यांनी छंदासाठी प्रामाणिकपणा आवश्यक असल्याचे सांगितले.

75 प्रकार

या प्रदर्शनामध्ये संग्राहकांनी संग्रह केलेल्या विविध विषयांवरील 75 फ—ेम्स प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत, यामध्ये भारताचा स्वातंत्र्यलढा, गणपतीचे दर्शन घडविणारे भारतीय संस्थानांवरील वित्तीय तिकिटे, फिलाटेलीच्या माध्यमातून मानवी संवेदना, अंतराळाचे अनावरण : उपग्रह आणि अंतराळ अन्वेषणाचे जग, ओळख पुणे शहराची व भारतीय मुंडासे अशा आकर्षक फ—ेम्समधून भारतीय वारसा आणि परंपरा उलगडल्या.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT