पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या दिंडी सोहळ्यात टाळमृदंगाचा गजर आणि 'ज्ञानोबा – तुकाराम'च्या जयघोषाने लक्ष्मी रस्ता, डेक्कन परिसर दुमदुमून गेला. या दिंडी सोहळ्यात पुणे शहर आणि परिसरातील सुमारे 4 हजार लोक सहभागी झाले होते. श्री दत्त मंदिरापासून या सोहळ्याला प्रारंभ झाला. तेथून लक्ष्मी रस्त्याने श्री खंडूजीबाबा विठ्ठल मंदिर चौक येथे सोहळ्याची सांगता झाली. सर्व सहभागी वारकर्यांना महाप्रसाद देण्यात आला. या सोहळ्यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. या वेळी विविध ठिकाणी भाविकांनी सोहळ्याचे भक्तिभावाने स्वागत केले.
सोहळ्यात संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी देवाचीचे विश्वस्त मंडळ, संत श्री एकनाथ महाराज यांचे वंशज योगेश महाराज पालखीवाले, योगिराज महाराज गोसावी, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार रवींद्र धंगेकर, हेमंत रासने आदी उपस्थित होते. अद्वैत वारकरी मंडळ, पश्चिम विभाग वारकरी मंडळ तसेच भारतीय वारकरी मंडळ अंतर्गत सर्व भजनी मंडळांचा सोहळ्यात मोठ्या प्रमाणात सहभाग होता, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष संदीप महाराज पळसे यांनी दिली.
हेही वाचा