पुणे

Pune News : सातगाव पठार भागात आढळल्या 137 कुणबी नोंदी

Laxman Dhenge

पेठ : पुढारी वृत्तसेवा : पठार भागातील पेठ, कुरवंडी व पारगाव तर्फे खेड (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील जुन्या रजिस्टरमध्ये कुणबी नोंदी आढळल्या आहेत. आतापर्यंत सातगाव पठार भागातील प्राथमिक शाळेत 137 कुणबी नोंदी आढळल्या आहेत, अशी माहिती केंद्रप्रमुख म्हातारबा कोंढावळे यांनी दिली.

सातगाव पठार भागातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नोंदी तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सातगाव पठार भागातील पेठ येथील श्रीवाकेश्वर विद्यालयाची स्थापना 1966 ला करण्यात आली आहे. बाकीच्या पारगाव येथील श्री. नवखंड माध्यमिक विद्यालय, भावडी येथील सोमनाथ नवले विद्यालय व कुरवंडी येथील हरीचंद्र तोत्रे विद्यालय यांची स्थापना सन 1984 नंतर झाली आहे.

त्यामुळे या तीन माध्यमिक शाळांमध्ये कुणबी नोंदी आढळल्या नाहीत, तर पेठ येथील विद्यालयात एकही कुणबी नोंद आढळली नाही.
येथील बहुतांश प्राथमिक शाळा 1910 ते 1920 दरम्यान स्थापन झाल्याने त्या शाळांतील रजिस्टरमध्ये कुणबी नोंदी आढळल्या आहेत. याप्रमाणे कुरवंडी, पेठ व पारगाव येथील तीन प्राथमिक शाळांमध्ये एकूण 137 कुणबी नोंदी आढळल्याचे आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सचिन तोडकर यांनी सागितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT