Sunetra Pawar 
पुणे

Pune NCP Crisis: अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा पेच; कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली

संघटनात्मक बैठकांचा अभाव आणि नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे पक्षात निर्माण झाली अनिश्चितता व नाराजी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राष्ट्रवादी काँग््रेासचे प्रमुख व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर पुण्यातील राष्ट्रवादी काँग््रेासला वालीच उरला नसल्याची भावना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह खासदार पार्थ पवारांकडून संघटनेसाठी वेळच दिला जात नसल्याने राष्ट्रवादी काँग््रेासमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.

महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात आकस्मिक निधन झाले. राष्ट्रवादी काँग््रेासच्या नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांसाठीच हा मोठा धक्का ठरला. एकहाती नेतृत्व असलेल्या अजितदादांच्या निधनानंतर पक्षात आपले काय होणार? असा मोठा प्रश्न पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपुढे उभा राहिला. मात्र, सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्रिपद आल्यानंतर तसेच पार्थ पवार यांना राज्यसभेवर संधी मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांना ताकद मिळेल, अशी आशा निर्माण झाली होती.

मात्र, आता जवळपास साडेतीन महिने उलटूनही या दोन्ही नेत्यांकडून कार्यकर्त्यांना वेळच दिली नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. आत्तापर्यंत पुण्यातील संघटनेची एकही बैठक या दोघांनी घेतलेली नाही. त्यातच संघटनेत नाराजीचे चित्र आहे. पश्चिम विभागाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप हे स्वीकृत नगरसेवक निवडीपासून नाराज असून, ते संघटनेच्या बैठकांना उपस्थित राहत नाहीत.

राज्यातील सत्तेत एकत्र असून, महापालिकेत राष्ट्रवादी काँग््रेासची भाजपकडून कोंडी केली जात आहे. राष्ट्रवादीला प्रभाग समिती अध्यक्षपदापासून दूर ठेवण्यासाठी सत्ताधारी भाजपने क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेत हस्तक्षेप करीत सोयीच्या रचना केल्या. त्याबाबत स्वत: उपमुख्यमंत्री पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दोनवेळेस पत्रव्यवहार करूनही महापालिका प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही. मात्र, मुख्य सभेत अडचणीच्या विषयात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र उपमुख्यमंत्री पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा विरोध मोडीत काढण्याचे काम केले आहे.

पक्षनेतृत्वाकडून ठोस भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे महापालिकेत विरोधी पक्षाची भूमिका घेण्याऐवजी भाजपसमवेत फरफटत जाण्याची वेळ राष्ट्रवादीवर येत आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे राष्ट्रवादी काँग््रेासच्या पदाधिकाऱ्यांपासून कार्यकर्त्यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आहे. मात्र, आम्ही नक्की दाद कोणाकडे मागायची? अशी भावना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. परिस्थिती अशीच राहिली तर पक्षाची अवस्था आणखीनच बिकट होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT