पुणे: आगामी पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग््रेासचे दोन गट एकत्र येणार नाहीत, असा स्पष्ट संदेश राष्ट्रवादी काँग््रेासचे (शरद पवार गट) पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शनिवारी (दि. 6) दिला. महाविकास आघाडीतून बाहेर पडून अजित पवार गटासोबत जाण्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. पत्रकार परिषद घेऊन याबाबत संयुक्त घोषणा होणार असल्याच्या बातम्याही पुढे आल्या होत्या. मात्र, शरद पवार यांच्याशी झालेल्या सखोल चर्चेनंतर प्रशांत जगताप यांनी या चर्चांना पूर्णविराम देत महाविकास आघाडीशी एकनिष्ठ राहून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले.
पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांची भेट घेत त्यांच्यासमोर पुणे महापालिका निवडणुकीचा सविस्तर आढावा सादर केला. महाविकास आघाडीत राहिल्यास तयार होणारी राजकीय समीकरणे, इतर पक्षांसोबत युती झाल्यास होणारे बदल, मतदारसंघनिहाय गणिते आदी विषयांवर या भेटीत त्यांनी शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर शरद पवार यांनी, ‘पुण्यासह राज्यातील महापालिका निवडणुका महाविकास आघाडीतूनच लढवाव्यात,’ असा ठाम संदेश दिल्याचे जगताप यांनी सांगितले. तसेच, पवारांनी सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांच्यासोबतही चर्चा करून पक्षाची अधिकृत भूमिका पुन्हा अधोरेखित केली आहे.
महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार पक्षाच्या पातळीवर कुणाचाच नसल्याचे पवारांनी स्पष्ट केल्याचे जगतापांनी सांगितले. या निर्णयाची औपचारिक घोषणा शशिकांत शिंदे लवकरच करतील, अशी माहितीही जगताप यांनी दिली. दरम्यान, काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या एकीच्या चर्चेला जोर आला होता. अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकत्र दिसल्याने पुण्यातही अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र, प्रशांत जगताप यांनी या कल्पनेचा तीव विरोध करून, “दोन्ही गट एकत्र आले तर मी पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून बाहेर पडेन,” अशी कठोर भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांच्या भेटीनंतर स्पष्ट झालेला निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र वेगळ्याच घडामोडी आहेत. तेथील राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी भाजपला रोखण्यासाठी अजित पवार गटासोबत संयुक्तपणे निवडणूक लढण्याची तयारी असल्याचा संदेश शरद पवारांना दिल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन ही भूमिका घेतल्याचे ते म्हणतात. मात्र, पुण्यात महाविकास आघाडीचाच मार्ग योग्य असल्याचे प्रशांत जगताप यांचे स्पष्ट मत आहे. या दोन्ही शहराध्यक्षांच्या भिन्न भूमिकांवर शरद पवार यांनी अंतिम तोडगा देत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग््राामीण या तिन्ही ठिकाणी महाविकास आघाडीच्या नावानेच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे जगताप यांनी सांगितले. आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील मतभेद कसे मिटतात आणि पुण्यातील महापालिका निवडणुकीचे चित्र कशाकडे वळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आम्ही शरद पवार गट म्हणून लढलो. पक्षात फूट पडल्यानंतर कठीण परिस्थितीत कार्यकर्त्यांनी झेंडा उचलून धरला. त्यांचे नुकसान होऊ नये, ही आमची भूमिका आहे. शरद पवार आमचे श्रद्धास्थान आहेत. त्यांच्या आदेशानुसारच आम्ही काम करीत आहोत. पुण्यातील निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढवावी, असा संदेश त्यांनी दिला आहे.प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग््रेास (शरद पवार गट)
स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. परंतु, तसा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही. आमची स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी आहे. युती किंवा आघाडीचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचा असेल. नेत्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल.सुनील टिंगरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग््रेास (अजित पवार गट)