महर्षीनगर: पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या वतीने अन्न-धान्य, भाजीपाला, कपडे आदी जीवनावश्यक साहित्य पाठवण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते पक्षाचा झेंडा दाखवून या गाड्या मार्केट यार्ड येथून नुकत्याच रवाना करण्यात आल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पर्वती मतदारसंघाचे अध्यक्ष संतोष नांगरे, शोभा नांगरे यांच्यासह मार्केट यार्डमधील व्यापारी, आडते आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही मदत पाठविण्यात आली आहे. (Latest Pune News)
पुणे शहरातून आलेली सर्व मदत पुण्यातील गुरुद्वाराच्या माध्यमातून पंजाबला पाठवली जाणार आहे. या वेळी गुरुद्वाराचे भोलासिंग अरोरा, छबिल पटेल, इस्माईल खान, राकेश कामठे, महेश हांडे, दिलीप अरुंदेकर, शंतनू जगदाळे, सुशांत ढमढेरे, गणेश पानसरे, रूपेश आखाडे, गौरव कापरे, समीर पटेल, शारुख खान, सलीम मुल्ला, प्रवीण जगताप, निलेश शिंदे, नाना कुटे, तेजस सोनवणे, उमेश कुंभार आदींसह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.