Pune Nashik highway traffic jam Pudhari
पुणे

Pune Nashik highway traffic jam: पुणे-नाशिक महामार्गाच्या बोटा येथे प्रचंड वाहतूककोंडी

यामुळे वाहनचालक व प्रवाशीवर्ग त्रस्त झाले.

पुढारी वृत्तसेवा

आळेफाटा: पुणे-नाशिक महामार्गाच्या चौपदरीकरण रस्त्याचे जिल्ह्याचे सरहद्दीवरील बोटा (ता. संगमनेर) परिसरात पुणेकडे येणारे रस्त्याचे सुरू असलेल्या क्राॅक्रिटीकरण कामामुळे शुक्रवारी (दि. १) सकाळपासून तीन तासाहून अधिक वेळ वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे वाहनचालक व प्रवाशीवर्ग त्रस्त झाले.

महामार्ग रस्त्याचे क्राॅक्रिटीकरण काम करताना वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचे ढिसाळ नियोजन यामुळेच ही प्रचंड अशी वाहतूक कोंडी झाली आहे. सकाळी ८ वाजल्यानंतर सुरू झालेल्या वाहतूक कोंडीमुळे सुमारे ८ किलोमीटर अंतरावर वाहनांच्या दुतर्फा रांगा दोन तासातच लागल्या होत्या. महामार्ग कर्मचारी व पोलिस यांच्यामुळे २ तासानंतर वाहतूक संथ गतीने सुरू झाली.

दरम्यान या वाहतूक कोंडीमुळे पुणे व नाशिककडे निघालेल्या प्रवाशीवर्गांचे व वाहनचालकांचे त्रस्त झाले आहे. त्यातच लग्न मुहूर्त असल्याने त्यांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. वाहतूक सुरळीत होण्यास अजूनही काही तास जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT