पुणे : यंदाच्या दिवाळी हंगामात पुणे रेल्वे विभागात धावणाऱ्या वंदेभारत एक्सप्रेस गाड्यांपैकी पुणे-नागपूर-पुणे वंदेभारत एक्सप्रेसने सर्वाधिक प्रभावी कामगिरी करत, रेल्वेला विक्रमी उत्पन्न मिळवून दिले आहे. दि. 17 ते 28 ऑक्टोबर दरम्यानच्या दहा फेऱ्यांमध्ये या गाडीमध्ये नियमित फेऱ्यांच्या 145 टक्क्यांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. पुण्यातून कोल्हापूर आणि हुबळीसाठी धावणाऱ्या वंदेभारत गाड्यांच्या तुलनेत पुणे-नागपूर-पुणे वंदेभारत रेल्वेला दिवाळीच्या काळात अधिक प्रतिसाद मिळाल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.(Latest Pune News)
प्रवाशांचा प्रतिसाद : 145 टक्क्यांहून अधिक
प्रवासी संख्या : 7 हजार 721
उत्पन्न : 1 कोटी 8 लाख 91 हजार 252
नागपूर-पुणे वंदेभारतही मागे नाही (ट्रेन नं. 26102)
प्रवाशांचा प्रतिसाद : 125 टक्क्यांहून अधिक
प्रवासी संख्या : 6 हजार 666
उत्पन्न : 91 लाख 72 हजार 669
दिवाळीच्या काळात पुणे-नागपूर वंदेभारतला मिळालेला 145 टक्क्यांहून अधिक प्रतिसाद अतिशय उत्साहवर्धक आहे. पुणे रेल्वे विभाग नेहमीच प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी कटिबद्ध आहे. वंदेभारत ही रेल्वे गाडी प्रीमियम दर्जाची असून, या सेवेचा प्रवाशांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.हेमंत कुमार बेहेरा, विभागीय वाणिज्य अधिकारी तथा जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग