भटक्या कुत्र्यांमध्ये मायक्रोचिप तंत्रज्ञान वापरणार File Photo
पुणे

PMC Stray Dogs Microchip: भटक्या कुत्र्यांमध्ये मायक्रोचिप तंत्रज्ञान वापरणार

राज्यातील पहिलीच महापालिका; 600 श्वानांना प्रायोगिक तत्त्वावर बसविणार मायक्रोचिप

पुढारी वृत्तसेवा

पुणे : भटक्या कुत्र्यांचे लसीकरण आणि नसबंदी वाढवण्यासाठी महापालिकेतर्फे विशेष प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून भटक्या कुर्त्यांमध्ये सेन्सर असलेली मायक्रोचिप बसवण्याचा महापालिकेचा मानस आहे. या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांची मान्यता मिळाली आहे. प्रायोगिक तत्त्वावर 600 श्वानांंना सुरुवातीला ‌’मायक्रोचिप‌’ बसवण्यात येणार आहे. यामुळे लसीकरणाची नोंद ठेवणे, कुर्त्यांची गणना करणे शक्य होऊ शकेल. पुणे महापालिका ही या प्रकारचा उपक्रम राबवणारी राज्यातील पहिली महानगरपालिका ठरणार आहे.(Latest Pune News)

शहर रेबीजमुक्त करण्यासाठी पालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये कुत्र्यांच्या त्वचेमध्ये इंजेक्शनच्या आकाराची अत्यंत छोट्या आकाराची मायक्रो चिप बसवण्याचा विचार सुरू आहे. मायक्रोचिपमध्ये स्कॅनर समाविष्ट असणार आहे. चिप मोबाईल ॲप्लिकेशनशी जोडली जाणार आहे. कोणत्या भागामधील किती कुत्र्यांचे लसीकरण झाले आहे, पुन्हा कधी करायचे आहे याबाबतचे मेसेज महापालिकेच्या आरोग्य विभागाला ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मिळू शकतील. त्याप्रमाणे लसीकरणामध्ये नियमितता आणली जाईल. मायक्रोचिपमध्ये कुत्र्याचा रंग, लिंग आदी माहितीचा समावेश केला जाईल. चिपच्या तंत्रज्ञानामुळे शहरासह समाविष्ट गावांमधील कुत्र्यांची नव्याने गणना करणे शक्य होईले. चिपमधील मटेरियल शरीरास अपायकारक नसल्याची आणि त्यामुळे कुत्र्यांना कोणतीही इजा होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.

श्वानाचे वय, नसबंदीबाबत मिळणार माहिती,

पशुवैद्यकीय विभागाला एका खासगी कंपनीने प्रायोगिक तत्त्वावर मोफत 600 ‌’मायक्रोचिप‌’ उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यानुसार पुढील आठवड्यापासून या ‌’मायक्रोचिप‌’ बमवण्याचे काम सुरू होणार आहे. मायक्रोचिप तांदळाच्या दाण्याएवढ्या आकाराची आहे. चीप बसवण्यासाठी वापरण्यात येणारे इंजेक्शन स्कॅनर मशीन यंत्राद्वारे स्कॅनिंग करण्यात येणार आहे. श्वानाचे वय, रंग, शस्त्रक्रियेची माहिती, कोणत्या परिसरातील आहे, पूर्वीच्या लसीकरणाची तसेच श्वान कुठल्या परिसरातील आहे, रेबीजचा संसर्ग झाला आहे का, नसबंदी झाली आहे का, याची माहिती मिळणार आहे.

श्वानांना मिळणार आधार कार्डप्रमाणे नंबर

‌‘मायक्रोचिप‌’ श्वानांच्या खांद्याच्या भागात इंजेक्शनद्वारे टोचल्या जाणार आहेत. यामध्ये आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. सध्या दिल्ली, गोवा, जयपूर, बंगळुरु या ठिकाणी या प्रकारचा उपक्रम राबवण्यात येत आहे. मायक्रोचिपला 15 अंकी युनिक नंबर असून या उपक्रमाद्वारे मनपा हद्दीतील व नव्याने समाविष्ट 32 गावांमधील सर्व श्वांनाची माहिती आणि संख्या कळणार आहे. नसबंदी शस्त्रक्रिया करताना श्वानांना आधार कार्डप्रमाणे नंबर मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT