Pune Municipal Corporation Pudhari
पुणे

Pune Municipal Project Approval: पुणे महापालिकेत 2000 कोटींच्या प्रकल्पांवरून वादंग

स्थायी समितीत ‘72 ब’ प्रकल्पांवर प्रश्नचिन्ह; निधी क्षमतेवर विरोधकांचा आक्षेप

पुढारी वृत्तसेवा

पुणे: क्षमता नसताना महापालिकेने तब्बल दोन हजार कोटींचे ‌‘72 ब‌’ अंतर्गत प्रकल्प स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवले होते. परंतु, या प्रकल्पांसाठी पैसे देण्याची क्षमता महापालिकेकडे आहे का? असा प्रश्न उपस्थित करत गेल्या सहा महिन्यांत प्रशासनाने ‌‘72 ब‌’ आणि ‌‘67 क‌’ चे किती विषय मंजूर केले, याची माहिती विरोधकांनी स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाला मागितली.

महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत चांदणी चौक ते भूगाव रस्त्यासह आणखी काही ‌‘72 ब‌’ चे प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवले होते. या रस्त्याच्या दायित्वाची रक्कम 200 कोटींपर्यंत गेल्याने विरोधकांनी यावर प्रश्न उपस्थित केले. कॉंग््रेास सदस्य प्रशांत जगताप यांनी महापालिकेची दायित्व घेण्याची क्षमता आहे का? सभागृहाने ही चुकीची प्रथा पाडू नये. नियमानुसार दायित्व घेताना प्रकल्पाची 50 टक्के रक्कम मंजूर असणे अपेक्षित आहे.

प्रशासनाने तब्बल 2 हजार कोटी रुपयांचे ‌‘72 ब‌’ चे प्रकल्प आणले असून, तेवढी रक्कम महापालिका कोठून आणणार? असा सवाल केला. गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाने निधी नसताना दायित्व घेण्याची चुकीची प्रथा पाडली आहे, असा आक्षेप त्यांनी घेतला. तसेच, गेल्या 6 महिन्यांत ‌‘72 ब‌’ आणि ‌‘67 क‌’ चे किती प्रस्ताव मान्य करण्यात आले, याची माहिती प्रशासनाला देण्यास सांगितले.

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी देखील हे चुकीचे असल्याचे मत मांडत अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांना प्रशासनाने किती प्रस्ताव मंजूर केले, याची माहिती देण्यास सांगितले. तसेच, चांदणी चौक ते भूगाव रस्त्याचा प्रस्ताव पुढच्या सभेसाठी घेण्यात आला.

सदस्य नसताना भाजप नगरसेवकाचे भाषण

स्थायी समितीचे सभासद नसताना भाजपचे नगरसेवक दिलीप वेडेपाटील हे सभेत उपस्थित होते. या सभेत सभासदांव्यतिरिक्त इतरांना बोलण्याची परवानगी नसते. मात्र, दिलीप वेडेपाटील यांनी बैठीत मुद्दे मांडल्याने विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली. बैठकीची परंपरा का मोडत आहात? नवे नियम का सुरू केले जातात, असे म्हणत दोन्ही बाजूंनी वादावादी झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT