पुणे

पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आज मंत्री पदाची शपथ घेणार

सोनाली जाधव

पुणे पुढारी वृत्तसेवा : पुण्याचे खासदार आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळणार आहे. आज (दि.९) ते मंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठा समाज तसेच विरोधकांनी पश्चिम महाराष्ट्रात मिळवलेले स्थान लक्षात घेत मुरलीधऱ मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचा निर्णय भाजप पक्षश्रेष्ठींनी घेतला असावा. मोहोळ यांना पंतप्रधान कार्यालयातून आज (दि.९) सकाळी संपर्क साधण्यात आला. त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा निर्णय घेतला. याचा फायदा पुण्यातील आणि परिसरातील राजकीय क्षेत्रावर चांगल्या पद्धतीने पडणार आहे असे भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

पुण्यात तिरंगी लढतीत मोहोळांची बाजी

पुणे लोकसभा मतदार संघात यंदा भाजपकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर आणि वंचितकडून वसंत मोरे अशी  तिरंगी लढत होती. या तिरंगी लढतीत भाजपाच्या मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली. पुणे लोकसभा मतदार संघासाठी मतदान १३ मे रोजी झाले होते. पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात २० लाख ६१ हजार २७६ मतदार आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघात फक्त ५१.२५ टक्के मतदान झाले होते.

SCROLL FOR NEXT