पुणे: पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर राजकीय चित्र अधिक स्पष्ट झाले आहे. सात उमेदवारांपैकी सहा जणांचे अर्ज वैध ठरले असून, एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांचा अर्ज अपक्ष उमेदवार म्हणून ग््रााह्य धरल्याने निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
मंगळवारी झालेल्या छाननी प्रक्रियेत अपक्ष उमेदवार उमेश म्हेत्रे यांचा अर्ज नियमांतील त्रुटींमुळे बाद ठरविण्यात आला, तर राष्ट्रवादी काँग््रेासचे (अजित पवार गट) अधिकृत उमेदवार विक्रम काकडे, राष्ट्रवादी काँग््रेासचे (शरद पवार गट) श्रीकांत पाटील तसेच अन्य उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. छाननीदरम्यान सर्वाधिक लक्ष विक्रम काकडे यांच्या अर्जाकडे लागले होते.
त्यांच्याविरोधात महापालिकेचा मिळकतकर थकीत असल्याचा आणि त्याचा प्रतिज्ञापत्रात उल्लेख नसल्याचा आक्षेप श्रीकांत पाटील यांच्या वतीने घेण्यात आला होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी हा आक्षेप फेटाळून लावला. मिळकतकराची थकबाकी हा लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार उमेदवारी अर्ज बाद करण्याचा वैध आधार नसल्याचे स्पष्ट करीत काकडे यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला. त्यामुळे काकडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग््रेास पक्षांनी भरलेले अतिरिक्त किंवा डमी अर्ज आता अपक्ष म्हणून ग््रााह्य धरले गेले आहेत. राष्ट्रवादी काँग््रेासचे (अजित पवार गट) सुनील टिंगरे आणि राष्ट्रवादी काँग््रेास (शरद पवार गट) यांचे डमी उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक प्रक्रियेत कायम राहणार आहेत.
विशेष म्हणजे, भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांचा अर्जही अपक्ष उमेदवार म्हणून वैध ठरल्याने महायुतीसमोर अंतर्गत आव्हान निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत 4 जून असून, त्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या या निवडणुकीकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले असून, अर्ज माघारीनंतर रंगत आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.