Katraj Kondhwa Road Widening Project: कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाला वेग; जागा न देणाऱ्यांवर सक्तीच्या भूसंपादनाची कारवाई

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेची कडक भूमिका; अतिक्रमण हटविण्याचीही तयारी
Katraj Kondhwa Road Widening
Katraj Kondhwa Road WideningPudhari
Published on
Updated on

पुणे: शहराच्या दक्षिण भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला गती देण्यासाठी महापालिका प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. रस्त्यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या मालमत्ताधारकांविरुद्ध सक्तीच्या भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ताब्यात आलेल्या जागांवरील अतिक्रमणांवरही लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.

Katraj Kondhwa Road Widening
Pune Agriculture Subsidy: पुणे जिल्ह्यातील 29,700 शेतकऱ्यांना ₹148.98 कोटींचे अनुदान; कृषी यांत्रिकीकरणाला सर्वाधिक निधी

कात्रज ते कोंढवा हा मार्ग शहरातील सर्वाधिक रहदारी असलेल्या रस्त्यांपैकी एक मानला जातो. वाढती लोकवस्ती, व्यावसायिक आस्थापना आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे या मार्गावर दिवसभर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. रस्तारुंदीकरणाचा प्रकल्प अनेक वर्षांपासून चर्चेत असला तरी जमीन संपादन आणि अतिक्रमणांच्या प्रश्नांमुळे त्याची अंमलबजावणी संथगतीने सुरू होती.

Katraj Kondhwa Road Widening
Sharadking Pomegranate Variety Approval: बारामतीतील ‘शरदकिंग’ डाळिंब वाणाला शासनमान्यतेची शक्यता; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

महापालिकेने आतापर्यंत अनेक मालमत्ताधारकांकडून आवश्यक जागा ताब्यात घेतली आहे. या जागांवर रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारी अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे हटविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय, अद्याप जागा हस्तांतरित न करणाऱ्या मालकांविरुद्ध संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार सक्तीचे भूसंपादन करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Katraj Kondhwa Road Widening
Maharashtra Onion Farmers Protest: मंचरमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे उग्र आंदोलन; पुणे-नाशिक महामार्ग रोखला

यापूर्वी संबंधित मालकांना जागा स्वेच्छेने देण्यासाठी वारंवार आवाहन केले होते. मात्र, काही ठिकाणी अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

Katraj Kondhwa Road Widening
Nira Left Canal Water Release: माळेगाव परिसरात दोन महिन्यांनंतर कालवा आवर्तन सुरू; शेतकऱ्यांना दिलासा

त्यामुळे रखडलेल्या प्रकल्पातील अडथळे दूर होऊन प्रत्यक्ष कामाला वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रस्तारुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर कात्रज, कोंढवा, खडी मशिन चौक आणि परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होणार असून, हजारो नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news