हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोलाईन 3 ची ट्रायल रन यशस्वी Pudhari
पुणे

Metro Trial: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोलाईन 3 ची ट्रायल रन यशस्वी

प्रकल्पाचे काम 87 टक्के पूर्ण; उर्वरित काम अंतिम टप्प्यात

पुढारी वृत्तसेवा

Hinjewadi to Shivajinagar Metro Line 3 Trial Run

पुणे: माण, हिंजवडी ते शिवाजीनगर यांना जोडणारा एक महत्त्वाचा उपक्रम असलेल्या पुणे मेट्रो लाईन 3 प्रकल्पाचे काम 87 टक्के पूर्ण झाले, असून उर्वरित काम अंतिम टप्प्यात आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी (दि. 4) दुपारी या मेट्रोच्या ट्रेनची माण डेपो ते पीएमआर 4 स्थानकापर्यंत पहिली चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), टाटा आणि सीमेन्स समूहाच्या नेतृत्वाखालील पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड यांच्यातील सार्वजनिक - खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलअंतर्गत विकसित केलेला हा प्रकल्प प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पाच्या कामास 25 नोव्हेंबर 2021 रोजी सुरुवात झाली असून, या कामाची मुदत मार्च 2026 पर्यंत आहे. (Latest Pune News)

या 23.3 कि.मी लांबीच्या कॉरिडॉरमध्ये 23 स्थानके आणि विद्यमान मेट्रो मार्गांसह एकसंध इंटरचेंज असणार आहे. हे पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येसाठी जलद, सुरक्षित वाहतुकीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. चार आधुनिक मेट्रो ट्रेनचा सेट आला आहे. प्रत्येक ट्रेनमध्ये तीन पूर्णपणे वातानुकूलित डबे असून, त्याची एकूण प्रवासी क्षमता अंदाजे एक हजार आहे. या गाड्या ताशी 80 कि.मी. वेगाने धावणार आहेत.

शुकवारी मेट्रोची माण डेपो ते पीएमआर 4 स्थानकापर्यंत पहिलीच चाचणी धाव घेण्यात आली. या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे पुणे मेट्रो लाईन 3 कार्यान्वित होण्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचली आहे. या मेट्रो लाईन 3 चे काम विक्रमी वेळेत पूर्ण होत असल्याने निश्चितच पुणे शहरासह संबंधित मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्याच्या द़ृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT