

Heavy Rainfall Alert in Maharashtra July 2025
पुणे: राज्यात पावसाचा जोर वाढला असून, 5 ते 10 जुलैदरम्यान राज्याच्या सर्वच भागांत मोठ्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकणात व विदर्भात संपूर्ण आठवडाभर जोर आहे, तर मध्य महाराष्ट्र अन् विदर्भात 6 व 7 जुलै रोजी मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. (Latest Pune News)
राज्यात मान्सून जोदार सक्रिय झाला असून, राज्यातील विविध भागांत मुसळधारेचा अंदाज मात्र कमी-जास्त प्रमाणात आहे. कारण, वार्याचा वेग आणि कमी दाबाचे पट्टे वेगवेगळे आहेत. त्यामुळे कोकणात 5 ते 10 जुलैदरम्यान, विदर्भात 5 ते 8 जुलैदरम्यान अतिमुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 6 व 7 जुलै रोजी मुसळधार ते अतिमुसळधारेचा अंदाज आहे.