Metro Pudhari
पुणे

Pune Metro Ganeshotsav Timetable: मेट्रोचे गणेशभक्तांसाठी विशेष नियोजन; अनंत चतुर्दशीला ४१ तास अखंड सेवा, दर ५ मिनिटांनी मेट्रो

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोचे विशेष नियोजन. १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान विशेष वेळापत्रक, गर्दीच्या वेळी ५ मिनिटांनी फेऱ्या आणि अनंत चतुर्दशीला ४१ तास अखंड सेवा.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गणेशोत्सवादरम्यान शहरात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता भाविकांचा प्रवास सुखकर व जलद व्हावा, यासाठी पुणे मेट्रो प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.

१४ ते २५ सप्टेंबरदरम्यान गर्दीच्या वेळी दर ५ मिनिटांनी मेट्रो फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. दरम्यान, अनंत चतुर्दशीच्या दिवशी मेट्रोसेवा सलग ४१ तास धावणार आहे, अशी माहिती महामेट्रो प्रशासनाने दिली आहे.

मेट्रोचे विशेष वेळापत्रक

१४ ते १६ सप्टेंबर (गणेश चतुर्थी) : - सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत (नियमित वेळ)

१७ ते २४ सप्टेंबर (गौरी पूजन व पुढील दिवस) :- सकाळी ६ ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत...

२५ ते २६ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी व विसर्जन) :- २५ सप्टेंबर सकाळी ६ ते २६ सप्टेंबर रात्री ११ वाजेपर्यंत सलग ४१ तास अखंड सेवा

२७ सप्टेंबरपासून :- सेवा पुन्हा पूर्ववत (सकाळी ६ ते रात्री ११) सुरू होईल.

प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना व बदल

महात्मा फुले मंडई स्थानक : गर्दीचे नियोजन करण्यासाठी १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान हे स्थानक एकदिशात्मक असेल. लोकमान्य टिळक पुतळा येथील द्वार क्र. ३ फक्त आत प्रवेशासाठी, तर छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील द्वार क्र. २ फक्त बाहेर पडण्यासाठी खुले राहील. हे स्थानक प्रामुख्याने परतीच्या प्रवासासाठीच वापरण्याचे आवाहन मेट्रोने केले आहे.

दर्शनार्थींसाठी पर्यायी स्थानके : मार्गिका १ (पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट) वरील भाविकांनी दर्शनासाठी कसबा पेठ स्थानकाचा वापर करावा. मार्गिका २ ने येणाऱ्या वनाजकडील प्रवाशांनी डेक्कन जिमखाना तर रामवाडीकडील प्रवाशांनी पीएमसी स्थानकावर उतरावे.

इंटरचेंज टाळा :- जिल्हा न्यायालय स्थानकावर गर्दी टाळण्यासाठी भाविकांनी तेथे मार्गिका बदलणे टाळावे, असे आवाहन पुणे मेट्रो प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT