Pune municipal elections 2026 Ajit Pawar Manifesto file photo
पुणे

Ajit Pawar NCP Manifesto: पुणेकरांना मेट्रो आणि बस प्रवास मोफत; जाहीरनाम्यात अजितदादांचे मोठे अश्वासन

Pune municipal elections 2026 : पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा संयुक्त जाहीरनामा आज (दि.१०) प्रसिद्ध करण्यात आला आहे.

मोहन कारंडे

Pune municipal elections 2026 Ajit Pawar NCP Manifesto

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा संयुक्त जाहीरनामा आज (दि.१०) प्रसिद्ध करण्यात आला. या संयुक्त जाहीरनाम्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यामध्ये पुणेकरांना मोफत मेट्रो आणि पीएमपी प्रवास देण्याचे अश्वासन दिले आहे.

काय आहेत जाहीरनाम्यातील महत्वाचे मुद्दे?

'पुण्यासाठी हमीपत्र' नावाने दोन्ही राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा आज प्रसिद्ध केला आहे. यावेळी दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित, परवडणारा आणि सुलभ करण्यासाठी सर्वांना मेट्रो आणि पीएमपीएमएल बस प्रवास मोफत उपलब्ध करून दिला जाईल, असे अश्वासन अजित पवार यांनी दिले. यामुळे कुटुंबांवरील आर्थिक भार कमी होईल, शिक्षण आणि कामाच्या ठिकाणी पोहोचणे सुलभ होईल, सार्वजनिक वाहतुकीच्या वापरास प्रोत्साहन मिळेल आणि खासगी वाहनांवरील अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी होईल, ज्यामुळे शहरातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.

त्याचबरोबर मेट्रोची लास्ट माइल कनेक्टिविटी व फिडर बस सेवा सुधारली जाईल. यासाठी वर्षाला ३०० कोटी खर्च अपेक्षित आहे. तो पुणेकरांच्या टॅक्स मधून केला जाईल. वाहतूक कोंडीमूळे वर्षाला पुणेकरांचे 10 हजार 800 कोटी रुपये पेट्रोलवर वाया जातात. ते बचत होतील, प्रदूषण कमी होईल आणि वाहतूक कोंडी कमी होईल, असा दावा अजित पवार यांनी केला आहे.

नळाद्वारे दररोज पाणी, ट्रॅफिकमुक्त, खड्डेमुक्त पुणे पिंपरी चिंचवड, नियमित स्वच्छता, हायटेक आरोग्य सुविधा, प्रदूषणमुक्त पुणे पिंपरी चिंचवड शहर, वाहतूक कोंडी सोडवणार, सगळे रस्ते रुंदीने विकसीत करणार, सार्वजनिक वाहतूक सक्षम करणार. स्वच्छ शहर करण्यासाठी सोसाट्या २० टक्के कर सवलत देणार, ग्रीन सोसायटी नामांकन देणार, घराच्या दोन किलोमीटर परिसरात रुग्णालय उभारणार, स्वतंत्र कर्करोग रुग्णालय उभारणार, गुंठेवारी करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया करणार, अशी अश्वासने दिली आहेत.

कुशल महिलांना ५ लाखापर्यंत बिनव्याची कर्ज

पालिकेकडून कुशल प्रशिक्षित महिलांना पाच लाखापर्यंत व्याजमुक्त कर्ज देण्याचे अश्वासनही या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. आम्ही आळशी नाही, आम्ही कामाची माणसं आहोत. पुढील पाच वर्षात दिशा बदलणारा जाहीरनामा आहे. केवळ कौतुकासाठी दिलेला जाहीरनामा नाही. ही कामं झाली नाही तर आम्हाला जाब विचारला जाणार आहे. पुढची साडेतीन वर्ष निवडणूका नाहीत त्यामुळे पूर्ण करणार आहोत, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT