पुणे: विवाहाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकाला लोणीकंद पोलिसांनी अटक केली. श्रीकांत बाळासाहेब शिंदे (वय २५, रा. मातोश्री निवास, शेजवळ पार्क, चंदननगर, मूळ रा. आडगाव, जि. नाशिक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी, एका 25 वर्षीय तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी शिंदे याची वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. आरोपीने तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून तरुणीला जाळ्यात ओढले. त्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, तरुणीने विवाहाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने नकार दिला. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
पोलिस उपनिरीक्षक बेंदगुडे तपास करत आहेत. दरम्यान, विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिस उपनिरीक्षक गावडे तपास करत आहेत.