Jaggery Pudhari
पुणे

Pune Market Yard Jaggery Price: पुणे मार्केट यार्डमध्ये गुळाचे दर तेजीत; श्रावणामुळे मागणी वाढण्याची शक्यता, उडीद डाळही महागली

दौंड-केडगावच्या भेसळमुक्त गुळाची आवक वाढली; मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगडमधून मागणी कायम, किराणा बाजारातील उलाढाल वाढण्याचे संकेत

पुढारी वृत्तसेवा

पुणे: दौंड आणि केडगाव परिसरातून बिगर भेसळीच्या गुळाची आवक वाढू लागली असली, तरी मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगडमधून मागणी कायम असल्याने गुळाचे दर तेजीत आहेत. यापूर्वी दररोज सुमारे ८० टन गुळाची आवक होत होती. अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर अनेक गुऱ्हाळे बंद झाल्याने आवक घटली होती. सध्या ती पुन्हा वाढून सुमारे ४० टनांवर पोहोचली आहे. श्रावण महिन्यात व्रत-उपवासांमुळे गुळाच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी दिली.

लांबलेल्या पावसामुळे पेरण्या उशिरा झाल्याचा परिणाम उडीद डाळीच्या दरावर झाला असून घाऊक बाजारात तिच्या दरात प्रतिकिलो नऊ रुपयांची वाढ झाली आहे. गुरुवार (दि. ९) आणि शुक्रवार (दि. १०) या दोन दिवसांत मार्केट यार्ड परिसरात सुमारे २० ते २५ हजार वारकऱ्यांचा मुक्काम होता. या काळात अन्नधान्य, खाद्यतेल आणि किराणा वस्तूंची चांगली विक्री झाली. मात्र, मागणी आणि पुरवठा संतुलित असल्याने शेंगदाणे, साबुदाणा, भगर, इतर सर्व प्रकारच्या डाळी, बेसन आणि नारळाचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिले. व्यापाऱ्यांच्या मते, श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानंतर सण-उत्सवांमुळे किराणा बाजारातील उलाढाल आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.

बाजारभाव पुढीलप्रमाणे:

साखर (प्रतिक्विंटल) ४२५०-४३०० रु. खाद्यतेले (१५किलो/लिटर) :- शेंगदाणा तेल २६५०-२९००, रिफाईंड तेल २३००-३१००, सरकी तेल २१५०-२६००, सोयाबीन तेल २१५०-२६००, पामतेल २१५०-२४५०, सूर्यफूल रिफाईंड तेल २३५०-२५००, खोबरेल तेल ४०००, वनस्पती २०५०-२५५० रु. तांदूळ :- गुजरात उकडा ३७००-४२००, मसुरी ३२५०-३५००, सोना मसूरी ५२००-७५००, एच.एम.टी. कोलम ५९००-६२००, लचकारी कोलम ६७००-७५००, चिन्नौर ६५००-७०००, ११२१-११५००-१२५००, आंबेमोहोर (सुवासिक) १४५००-१६५००, बासमती अखंड १२५००-१४५००, बासमती दुबार १००००-१०५००, बासमती तिबार १०५००-११०००, बासमती मोगरा ६०००-६५००, बासमती कणी ४५००-५०००, १५०९-१०००-११०००, इंद्रायणी ६००० रु. गहू - लोकवन नं. १ ४२५०-४५००, लोकवन नं. २ ३८००-४१००, नं.३ ३२००-३७००, सिहोर नं. १ ५९००-६५००, सिहोरी ३८५०-४४५०, मिलबर ३०००-३०५० रु. ज्वारी :- गावरान नं. १ ५७००-६५००, गावरान नं.२ ५२००-५५००, नं.३ ४७००-५१००, दूरी नं.१ ३८००-४०००, दूरी नं. २ ३५००-३७०० रु

बाजरी :- महिको नं.१ ३४००-३७००, महिको नं.२ ३१००-३३००, गावरान ३०००-३२००, हायब्रीड २८५०-३०००रु. गूळ :- गूळ नं. १ ४७००-४८५०, गूळ नं.२ ४५२५-४६५०, गूळ नं.३ ४४००-४४७५, बॉक्स ४७००-५६०० रु. डाळी :- तूरडाळ १००००-१२५००, हरभराडाळ ७३००-७५००, मूगडाळ ९०००-१००००, मसूरडाळ ७५००-७६००, मटकीडाळ ८२००-८३००, उडीदडाळ १००००-१२७०० रु. कडधान्ये :-हरभरा ७१००-७५००, हुलगा ६६००-७२००, चवळी ८१००-१०५००, मसूर ७५००-८२००, मूग ९२००-१२०००, मटकी गावरान १५५००-१७५००, मटकी पॉलिश ८५००-९०००, मटकी गुजरात १६५००-१७५००, मटकी राजस्थान ७५००-८०००, मटकी सेलम १७५००-१८७००, वाटाणा हिरवा ५२००-५६००, वाटाणा पांढरा ४८००-५२००, काबुली चणा ७६००-११००० रु.

साबुदाणा :-साबुदाणा नं.१ ७०००, साबुदाणा नं.२ ६५००, साबुदाणा नं.३ ६२०० रु. वरई भगर :-२००००-२१०००, सावा भगर १९०००-२०००० रु. गोटा खोबरे ३८०००-४०००० रु. शेंगदाणा :- जाडा ११५००-१३०००, स्पॅनिश–१४०००-१५०००, घुंगरु १३०००-१४००० धने :- गावरान १२०००-१३०००, इंदूर १५०००-१७००० इंदुर सुपर २५०००-३०००० रु. पोहे :- मध्य प्रदेश ४६००-४९००,पेण ४६००-४८००, मध्यम पोहा ४६००-४८००, दगडी पोहा ४८००-५१००, पातळ पोहा ५२००-५८००, सुपर पोहा ५२००-५८००, भाजका पोहा ६५०-७५०, मका पोहा ५५०-६५०, भाजके डाळे ३२००-३८००, मुरमुरा सुरती (९किलोस) ५६०, भडंग ८५०-११००, घोटी ५४० रु. रवा, मैदा, आटा- (५० किलोचा भाव) आटा १६००-१६५०, रवा १६५०-१७५०, मैदा १६५०-१७५०, बेसन:- (५० किलोस) ३९००-४६५० रु. मिरची: काश्मीरी ढब्बी ६००००-६५०००, ब्याडगी ३५०००-५००००, लवंगी तेजा २३०००-२५०००, गुंटूर २४०००-२६०००, खुडवा गुंटूर १२०००-१३०००, खुडवा ब्याडगी १६०००-१८००० रु. नारळ :- (शेकडयाचा भाव): नवा पॅकिंग १७००-१८५०, मद्रास ४६००-४८००, पालकोल जुना २१००-२३००, सापसोल ३५००-५००० रु.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT