पुणे: उन्हाळी सुट्ट्यांमुळे नागरिकांचे बाहेरगावी जाणे आणि सध्या कोणताही मोठा सण-उत्सव नसल्याने मार्केट यार्डातील भुसार बाजारात मंदीचे वातावरण कायम आहे. बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाल्याने बाजारातील व्यवहार संथ झाले असून, बहुतांश जिन्नसांना अपेक्षित उठाव मिळत नसल्याचे चित्र आहे. व्यापाऱ्यांच्या मते, डिझेल दरवाढ अथवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खाद्यतेलाचे सेवन कमी करण्याबाबत केलेल्या आवाहनाचा बाजारातील व्यवहारावर अद्याप कोणताही विशेष परिणाम झालेला दिसून आलेला नाही.
मागील दोन आठवड्यांपासून वाढलेल्या शेंगदाण्याच्या दरात आता किलोमागे तीन ते चार रुपयांची घसरण झाली आहे. तसेच मागील काही दिवसांत गोटा खोबराचे भाव वाढल्याने ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत असून, परिणामी गोटा खोबराच्या दरात किलोमागे तब्बल वीस रुपयांची घट झाली आहे. बेसनच्या दरात 50 किलोमागे शंभऱ रुपयांची वाढ झाली असून डाळींच्या बाजारातही तेजी कायम आहे. तुरडाळ किलोमागे दोन ते तीन रुपयांनी महागली असून हरभरा डाळीच्या भावातही किलोमागे तीन ते चार रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, उर्वरित डाळींचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, कर्नाटकातील तुंगभद्रा धरणाच्या कामामुळे पाणी सोडण्यात आले नसल्याने एक पीक प्रभावित झाले आहे. त्याचा परिणाम तांदूळ बाजारावर दिसून येत असून कोलम तांदळाच्या दरात सलग दुसऱ्या आठवड्यात किलोमागे दोन ते तीन रुपयांची वाढ झाली आहे. साखरेच्या दरातही किलोमागे एक रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. गुळाला सध्या चांगली मागणी असली तरी ऊसाच्या तुटवड्यामुळे अनेक गुऱ्हाळे बंद असल्याने बाजारातील आवक घटली आहे. त्यामुळे गुळाचे दर टिकून आहेत. तर खाद्यतेल, विविध प्रकारचे धान्य, साबुदाणा, भगर आणि नारळ यांच्या दरात मागील आठवड्याच्या तुलनेत कोणताही मोठा बदल झालेला नसून भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
बाजारभाव पुढीलप्रमाणे:
साखर (प्रतिक्विंटल) 4150-4200 रु. खाद्यतेले (15किलो/लिटर) :- शेंगदाणा तेल 2650-2900, रिफाईंड तेल 2300-3100, सरकी तेल 2150-2600, सोयाबीन तेल 2150-2600, पामतेल 2150-2450, सूर्यफूल रिफाईंड तेल 2350-2500, खोबरेल तेल 4000, वनस्पती 2050-2550 रु. तांदूळ:- गुजरात उकडा 3650-4200, मसुरी 3100-3500, सोना मसूरी 4400-7400, एच.एम.टी. कोलम 5700-6000, लचकारी कोलम 6600-7100, चिन्नौर 6500-7000, 1121-11500-12500, आंबेमोहोर (सुवासिक) 14500-16500, बासमती अखंड 12500-14500, बासमती दुबार 10000-10500, बासमती तिबार 10500-11000, बासमती मोगरा 6000-6500, बासमती कणी 4500-5000, 1509-1000-11000, इंद्रायणी 6000 रु. गहू - लोकवन नं. 1 4150-4400, लोकवन नं. 2 3700-3900, नं.3 3075-3650, सिहोर नं. 1 5900-6500, सिहोरी 3850-4450, मिलबर 2850-2900 रु. ज्वारी :- गावरान नं. 1 5700-6500, गावरान नं.2 5200-5500, नं.3 4700-5100, दूरी नं.1 3800-4000, दूरी नं. 2 3500-3700 रु बाजरी:- महिको नं.1 3800-4000, महिको नं.2 3400-3600, गावरान 3300-3500, हायब्रीड 3050-3300रु. गूळ :- गूळ नं. 1 4650-4850, गूळ नं.2 4500-4600 गूळ नं.3 4300-4450, बॉक्स 4500-5500 रु. डाळी:- तूरडाळ 10000-12700, हरभराडाळ 7300-7500, मूगडाळ 9000-10000, मसूरडाळ 7500-7600, मटकीडाळ 8200-8300, उडीदडाळ 10000-12000 रु.
कडधान्ये:-हरभरा 6400-7000, हुलगा 5500-6000, चवळी 7800-9800, मसूर 7300-8200, मूग 9400-12500, मटकी गावरान 16000-16500, मटकी पॉलिश 7000-7900, मटकी गुजरात 16000-17000, मटकी राजस्थान 6600-7000, मटकी सेलम 17200-18400, वाटाणा हिरवा 5200-5500, वाटाणा पांढरा 5000-5200, काबुली चणा 7200-10600 रु. साबुदाणा :-साबुदाणा नं.1 6200, साबुदाणा नं.2 5800, साबुदाणा नं.3 5600 रु. वरई भगर :-13500-14000, सावा भगर 13000-13500 रु. गोटा खोबरे 37000-39000 रु. शेंगदाणा :- जाडा 11000-12500, स्पॅनिश12000-13000, घुंगरु 11200-12200 धने :- गावरान 12000-13000, इंदूर 15000-17000 इंदुर सुपर 25000-30000 रु. पोहे :- मध्य प्रदेश 4600-4900,पेण 4600-4800, मध्यम पोहा 4600-4800, दगडी पोहा 4800-5100, पातळ पोहा 5200-5800, सुपर पोहा 5200-5800, भाजका पोहा 650-750, मका पोहा 550-650, भाजके डाळे 3200-3800, मुरमुरा सुरती (9किलोस) 560, भडंग 850-1100, घोटी 540 रु. रवा, मैदा, आटा- (50 किलोचा भाव) आटा 1600-1650, रवा 1650-1750, मैदा 1650-1750, बेसन:- (50 किलोस) 3900-4650 रु. मिरची: काश्मीरी ढब्बी 60000-65000, ब्याडगी 35000-50000, लवंगी तेजा 23000-25000, गुंटूर 24000-26000, खुडवा गुंटूर 12000-13000, खुडवा ब्याडगी 16000-18000 रु. नारळ :- (शेकडयाचा भाव): नवा पॅकिंग 1700-1850, मद्रास 4600-4800, पालकोल जुना 2100-2300, सापसोल 3500-5000 रु.