Mandai Metro Station Pudhari
पुणे

Mandai Metro Station: गणेशोत्सवात मंडई मेट्रोस्थानकावर ‘वन-वे’; गेट ३ मधून प्रवेश, गेट २ मधून बाहेर पडता येणार!

१४ ते २६ सप्टेंबरदरम्यान एकदिशात्मक प्रवास योजना; गर्दी आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर महामेट्रोचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गणेशोत्सवाच्या काळात मध्यवर्ती पुण्यातील गर्दी विचारात घेता महामेट्रो प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने महात्मा फुले मंडई मेट्रोस्थानकावर एकदिशात्मक प्रवास योजना लागू करण्यात आली आहे.

दि. १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान हे स्थानक एकदिशात्मक नियमांनुसार सुरू राहणार असून, त्यानुसारच प्रवाशांनी प्रवास करावा, असे आवाहन मेट्रो प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

असे आहे मंडई मेट्रोस्थानकाचे नवीन एकेरी नियोजन

  • गेट नंबर ३ (फक्त प्रवेश): लोकमान्य टिळक पुतळा (मंडई) येथील प्रवेशद्वार क्रमांक ३ चा वापर भाविकांना फक्त स्थानकात आत प्रवेश करण्यासाठी करता येईल.

  • गेट नंबर २ (फक्त बाहेर पडणे): छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील प्रवेशद्वार क्रमांक २ हे फक्त भुयारी स्थानकातून बाहेर पडण्यासाठीच खुले राहील.

  • परतीचा प्रवास: हे स्थानक प्रामुख्याने परतीच्या प्रवासासाठी वापरण्याचे आवाहन मेट्रोने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT