Night Construction Pudhari
पुणे

Pune Night Construction: कोरेगाव पार्क ॲनेक्समध्ये रात्रीच्या बांधकामामुळे नागरिक त्रस्त

पीएमसीच्या निष्क्रियतेचा आरोप करत रहिवाशांनी तक्रारी केल्यानंतरही बांधकाम सुरूच असल्याने वाद चिघळला आहे

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कोरेगाव पार्क ॲनेक्स परिसरात रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या बांधकामामुळे नागरिक त्रस्त झाले असून, या प्रकरणात आता वाद अधिकच तीव झाला आहे. ‌‘ॲटेलियर ग््राीन्स‌’ सोसायटीतील एका रहिवाशाने पुणे महापालिकेच्या निष्क्रियतेचा आरोप करत वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे म्हटले आहे.

सुदीप माने यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे धाव घेतली असून, त्यांनी 11 दिवसांपासून सुरू असलेल्या प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, परिसरात रात्री उशिरापर्यंत जेसीबी व इतर यंत्रसामग््राीद्वारे बांधकाम सुरू असते, जे नियमांचे स्पष्ट उल्लंघन आहे. रात्री 9.30 नंतरही काम सुरू राहत असल्याने नागरिकांच्या झोपेचा व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

माने यांनी पोलिस ठाण्यातही तक्रार नोंदवली होती. मात्र, त्यानंतरही त्याच रात्री बांधकाम पुन्हा सुरू झाले. पीएमसीकडे केलेली तक्रार सहा वेळा विविध विभागांकडे वर्ग करण्यात आली, परंतु प्रत्यक्ष तपासणी किंवा कारवाई झाली नाही. एका अधिकाऱ्याने ही तक्रार ‌‘मच्छर त्रास‌’ म्हणून चुकीच्या विभागाकडे पाठविल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

दरम्यान, पीएमसीने बांधकामाच्या वेळेत शिथिलता देत रात्री 9 वाजेपर्यंत काम करण्यास परवानगी दिल्याचे समोर आले आहे. मात्र, बांधकाम यानंतरही सुरूच राहत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

माने यांनी यासंदर्भात व्हिडीओ पुरावे सादर केले असून, त्यांनी थेट महापालिका आयुक्तांकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे प्रशासनातील कार्यपद्धती, अंमलबजावणीतील त्रुटी आणि नागरिकांच्या तक्रारींकडे होणारे दुर्लक्ष यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‌‘एमपीसीबी‌’कडून स्वतंत्र चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT