पुणे: भोंदू राधामोहन मिश्राने तरुणीवर लैंगिक अत्याचार करताना अक्षरशः विकृतीचा कळस गाठल्याचे समोर आले आहे. मिश्रा त्याच्या महिला भक्त आरोपींसमोरच तरुणीवर अत्याचार करत असे. या संशयित महिला आरोपींनी तरुणीच्या गुप्तांगाला टेझर गनने शॉक देऊन मेनबत्तीचे चटके दिले आहेत. मिश्राचा अत्याचार आणि मारहाण हा प्रसाद आहे. तो प्रसाद आम्हीदेखील घेतो, असे या महिला तरुणीला म्हणत असत. पुरवणी जबाबातून हा धक्कादायक प्रकार पुढे आल्याने खळबळ उडाली आहे.
ईश्वराचा अवतार असल्याचे सांगून, १७ वर्षांपासून मिश्राने तरुणीचा शारीरिक, मानसिक छळ करून बलात्कार केला. याप्रकरणी, खराडी पोलिस ठाण्यात भोंदू राधामोहन मिश्रा, त्याचा साथीदार स्वामी कंवल नयन याच्यासह सहा महिलांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. मिश्रासह सर्व आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. मिश्रा याने तरुणीच्या कुटुंबीयांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत त्यांना आपल्या जाळ्यात खेचून मॉडर्न गुरुकुलच्या नावाखाली आस्थेचा बाजार मांडला होता. त्यातून तो तरुणीवर लैंगिक अत्याचार करत होता. त्याच्या या विकृतीमध्ये महिला आरोपींनीदेखील त्याला साथ दिल्याचे समोर आले आहे.
पीडित तरुणी २०१३ मध्ये उबाळेनगर येथील मिश्राच्या आश्रमात कुटुंबीयांसह वास्तव्यास होती. या वेळी मिश्रासोबत त्याचे भक्तदेखील तेथे वास्तव्यास होते. जे की, आताच्या गुन्ह्यातील महिला आरोपी आहेत. याच महिला आरोपी तरुणीला काय शिक्षा द्यायची, हे ठरवत होत्या. दिलेले काम वेळेत पूर्ण नाही केले तर टेझर गनने मानेला शॉक देत होत्या. तसेच, त्यांनी तरुणीला मिश्रा याचे मूत्रसुद्धा पाजले आहे. महिला आरोपी तरुणीच्या अंगावर बसायच्या, तर मिश्रा तिला दांडक्याने मारहाण करत होता.
त्या महिला तिला मिश्राच्या खोलीत ढकलायच्या?
मिश्राच्या भक्त असलेल्या महिला आरोपी पीडित तरुणीला विवस्त्र करून मिश्राच्या खोलीत ढकलून देत होत्या. मिश्रा तरुणीवर बळजबरीने बलात्कार करत होता. तरुणीने मिश्राला विरोध करताच या महिला तिला म्हणायच्या तू राधामोहन यांना का विरोध करतेस, आम्ही पण ही शिक्षा घेतो. यामुळे आपले कल्याण होणार आहे. कारण राधामोहन हे देव आहेत.
मिश्राची मारहाण म्हणजे प्रसाद?
भोंदू मिश्रा तरुणीला मारहाण करत असे. त्याला त्याच्या आरोपी भक्त महिला प्रसाद म्हणून संबोधित असत. मिश्राच्या मारहाणीने आपले पाठीमागील पाप धुवून जाते. मिश्रा तरुणीला मारहाण करत असताना महिला आरोपी तिला पकडून ठेवत असत. त्यांनी देखील तरुणीला मारहाण केल्याची माहिती आहे.
पॉर्न व्हिडीओ दाखवून लैंगिक शोषण
आरोपी भक्त महिलांपैकी एक जण भोंदू मिश्रा याला पॉर्न व्हिडीओ दाखवत असे. त्यानंतर मिश्रा हा तरुणीवर लैंगिक अत्याचार करत होता. अनेकदा तरुणीचे हात पाय बांधून देखील तिच्यावर अत्याचार करण्यात आले असल्याचे समजते. या कृत्यामध्ये सर्व महिला आरोपी मिश्रा याला मदत करत होत्या. तरुणीला अनेकदा आरोपींनी इंजेक्शनदेखील दिल्याचे पुढे आले आहे. इंजेक्शनने तरुणीला गुंगी येत होती.
इतर महिला, मुलींवरही अत्याचार
राधामोहन मिश्रा हा आश्रमात साधूसारखा वागत असे. मात्र, त्याची दुसरी काळी बाजू आहे. त्याने पीडित तरुणीसह इतर महिला, मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा पीडित तरुणीने केला आहे.
खराडी येथील प्रकरणात अटक केलेल्या महिला आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात बेकायदेशीर अटकेविरोधात याचिका दाखल केली आहे. मात्र, या गुन्ह्यात संबंधित महिला आरोपींचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे तपासातून समोर आले आहे. तसेच, हा प्रकार अत्यंत गंभीर आणि समाजमनाला हादरवणारा असल्याची बाब आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.शिशिर हिरे, मुख्य सरकारी वकील, महाराष्ट्र शासन