पुणे: शहरातील कोहिनूर ग््रुाप आणि महालक्ष्मी ग््रुाप यांच्या भागीदारीने सिंगापूरच्या केपेल लँडला तब्बल 11 लाख चौरस फुटांचा एएए श्रेणीतील आयटी टॉवर सुपूर्द केला. अवघ्या 24 महिन्यांच्या विक्रमी कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करण्याची कामगिरी बांधकाम व्यावसायिक कृष्णकुमार गोयल यांनी केली आहे.
पुण्यातील खराडी आयटी कॉरिडॉरमध्ये चार एकर जागेवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प जागतिक मानकांनुसार आधुनिक डिझाइनचे प्रतिनिधित्व करतो. या विकासामध्ये तीन बेसमेंट, एक ग््रााउंड फ्लोअर, एक मेझानाईन, तीन पोडियम स्तर आणि चौदा कार्यालयीन मजले आहेत.
प्रत्येक मजल्यावर सुमारे 80 हजार चौरस फूट वापरयोग्य क्षेत्र उपलब्ध आहे. येथे 11 हजारांहून अधिक व्यावसायिकांना सामावून घेण्याची क्षमता आहे. याप्रसंगी कोहिनूर ग््रुापचे चेअरमन कृष्णकुमार गोयल म्हणाले की, हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प वेळेत दर्जेदारपणे पूर्ण करणे हे एक आव्हान होते आणि आम्ही त्यात यश मिळवले. असा जागतिक कीर्तीचा प्रकल्प पूर्ण करण्याचा मान कोहिनूर आणि महालक्ष्मी ग््रुापने संयुक्तपणे मिळवला आहे. भविष्यात देखील असे आंतरराष्ट्रीय महाकाय प्रकल्प आम्ही निश्चित पूर्ण करू.