पुणे

Pune illegal Demolition : १३ हजार ५०० फूट अनधिकृत बांधकामांवर हातोडा

धनकवडी आणि आंबेगाव खुर्द परिसरात अनधिकृत बांधकामांविरोधात धडक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

धनकवडी : धनकवडी आणि आंबेगाव खुर्द परिसरात झालेल्या अनधिकृत बांधकामावर पालिकेने हातोडा मारला असून, परिसरातील तब्बल १३ हजार ५०० फूट अनधिकृत बांधकाम भुईसपाट करण्यात आले. १ जेसीबी, १ गॅस कटर आणि ७ अतिक्रमण कर्मचाऱ्यांच्या मदतीने पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग (झोन क्र. ०२) कडून ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिस कर्मचारी व महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या (MSF) सहकार्य लाभले.

नवीन हद्दीतील धनकवडी सर्वे नं. २२, सर्वे नं. ३ आणि आंबेगाव खुर्द सर्वे नं. ४१, साई मंदिर परिसरामागील दोन गल्ल्यांमध्ये आर.सी.सी., पक्क्या स्वरूपातील अनधिकृत बांधकाम उभारले असल्याची माहिती मिळाल्यानंतर या बांधकामांवर कारवाई करण्यात आली.

कारवाईदरम्यान १३,५०० चौरस फूट अनधिकृत बांधकाम क्षेत्र निष्कासित करण्यात आले, अशी माहिती महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून देण्यात आली. ही कारवाई महापालिकेचे बांधकाम विकास विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश बनकर आणि झोन क्र. ०२ चे कार्यकारी अभियंता नवाळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या मोहीमेत उप अभियंता प्रवीण भावसार,कनिष्ठ अभियंते गणेश ढगे आणि मोहन चव्हाण तसेच बांधकाम विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT