High Security Number Plate pudhari photo
पुणे

Pune HSRP Number Plate Deadline: पुण्यात HSRP नंबर प्लेटसाठी अंतिम मुदत ३० जून २०२६; न बसवल्यास दंड व सेवा बंद

जुन्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अनिवार्य; मुदतीनंतर दंडासह आरटीओ सेवा तात्काळ थांबणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे जिल्ह्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांना ''हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट'' (एचएसआरपी) बसविणे अनिवार्य केले असून, यासाठी आता ३० जून २०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.

या मुदतीनंतरही ज्या वाहनांना ही नंबरप्लेट बसवली नसेल, अशा वाहनधारकांवर १ हजार रुपये दंड आकारण्यात येईल तसेच त्यांच्या वाहनांशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण आरटीओ सेवा तातडीने थांबविल्या जातील, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी दिली.

केंद्रीय मोटर वाहन नियम, १९८९ च्या नियम ५० नुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व वाहनांना एचएसआरपी लावणे बंधनकारक आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ३० जूनपूर्वी ज्या वाहनधारकांनी ही नंबरप्लेट बसवली नाही,

त्यांच्या वाहनांची कामे (योग्य त्या प्रमाणपत्र नूतनीकरणाव्यतिरिक्त) पूर्णपणे थांबविण्यात येणार आहेत. यात वाहन हस्तांतरण, वाहनावरील कर्जबोजा चढविणे किंवा उतरविणे, वाहनाची पुनर्नोंदणी, वाहनात बदल करणे, परवाना नूतनीकरण या कामांचा समावेश असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT