Pune Hotels Crisis Pudhari
पुणे

Pune Hotels Crisis: गॅस कपातीचा फटका; पुण्यात हॉटेल्सच्या मेनूमधून भजी-वडे, चहा गायब

गॅस बचतीसाठी काही हॉटेल मालकांचा नवा फंडा; युद्धजन्य परिस्थितीचा फटका

पुढारी वृत्तसेवा

पुणे : रशिया-युक्रेन युद्धामुळे उद््‌‍भवलेल्या जागतिक परिस्थितीचा थेट परिणाम आता पुणेकरांच्या जिभेवर आणि खिशावर होऊ लागला आहे. गॅसपुरवठ्यात कपात झाल्याने शहरातील नामांकित हॉटेल व्यावसायिकांनी गॅस बचतीचा नवा मार्ग अवलंबला असून, अनेकांनी आपल्या मेनूमधून भजी, वडे, पुऱ्या यासारखे तळलेले पदार्थ आणि चहा तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

तळलेले पदार्थ कात्रीत...

गॅसचा सर्वाधिक वापर हा तळण्याच्या प्रक्रियेत होतो. त्यामुळे आपटे रस्त्यावरील श्रेयस हॉटेलच्या व्यवस्थापक गीता तांबे म्हणाल्या, आम्हाला 80 टक्के गॅसपुरवठा होणार असल्याचा संदेश मिळाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही पुरी, भजी, बटाटेवडे, थालीपीठ आणि अळूवडी यांसारखे पदार्थ बनवणे बंद केले आहे. गॅसची बचत करणे हाच यामागचा उद्देश आहे. जरी आज ग््रााहकांचा प्रतिसाद कळला नाही, तरी वीकेंडला याचे खरे चित्र समोर येईल. गरज पडल्यास कोळशावरच्या चुली पेटविण्याचीही आमची तयारी आहे.

चहा आणि नाश्त्यावरही मर्यादा केवळ मोठे हॉटेलच नाही, तर उपाहारगृहेदेखील अडचणीत आली आहेत. समिंद्रा हॉटेलचे संचालक ऋषिकेश गोगावले यांनी सांगितले की, कमर्शियल (निळ्या) गॅस सिलिंडरचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. त्यामुळे आम्ही तळलेले पदार्थ आणि सातत्याने उकळणारा चहा सध्या बंद केला आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर आगामी काळात मोठे संकट उभे राहील.

आशा डायनिंग हॉल:

साधेपणा ठरला फायदेशीर दुसरीकडे, आशा डायनिंग हॉलचे अरुण किणी यांनी वेगळा अनुभव सांगितला. आमच्याकडे साध्या पद्धतीचे जेवण मिळते, ज्यात तळलेल्या पदार्थांचा समावेश नसतो. त्यामुळे गॅस पुरवठ्यातील 20 टक्के कपातीचा फटका आम्हाला सध्या तरी आम्हाला बसलेला नाही. मात्र, जागतिक स्तरावरील ही युद्धजन्य स्थिती लवकरात लवकर निवळावी हीच आमची इच्छा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT