Nitesh Rane Chinchwad speech Pune
पुणे

Pune Hindu Conference| जिहादींचे आक्रमण रोखा : नीतेश राणे

सकल हिंदू समाज लक्ष्मीनगर-पर्वती यांच्या वतीने शनिवारी विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी राणे बोलत होते.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: आजूबाजूला वाढणारे जिहादी आक्रमण कमी करण्यासाठी हे हिंदू संमेलन आहे. जिथे जिथे हे संमेलन होत आहे, त्या ठिकाणी हिंदू एकत्र येत आहेत. हिंदू म्हणून आपण येथे बसलोय. गाय, देवीदेवतांकडे जर कोणी वाकड्या नजरेने बघत असेल, तर याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असा इशारा मत्स्योद्योग आणि बंदरे विकासमंत्री नीतेश राणे यांनी दिला.

सकल हिंदू समाज लक्ष्मीनगर-पर्वती यांच्या वतीने शनिवारी विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी राणे बोलत होते. ते म्हणाले, उशिरा आल्यामुळे सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही तुमचे ईद, मोहरम, बाशी ईद सण साजरे करू शकता; मग आम्ही आमचे सण का साजरे करू शकत नाही? हे हिंदुराष्ट्र आहे, सर्वांत आधी हिंदूंचे हित पाहिले जाते. मी चारवेळा आमदार झालो. ते हिंदूंच्या मतांवरच.

सारसबागेत बीफ कसे येते?

सारसबागेतील शहरातील काही लोक बीफ आणून खातात, ही बाब गंभीर असून, सिद्धिविनायक गणपतीसमोर हे कृत्य खपवून घेतले जाणार नाही. तसेच, अशोक खरात हिंदू आहेत; मात्र, चूक ती चूकच, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कडक कारवाई केली की नाही. पुण्यात कोणत्याही कॉर्पोरेट कंपनीत माझ्या हिंदू बहिणीकडे वाकड्या नजरेने बघितले तर खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT