पुणे : शहरात गुरुवारी आणि शुक्रवारी अवकाळी पावसाने पुन्हा एकदा दाणादाण उडवून दिली. गुरुवारी (दि.२३) पाडव्याच्या दिवशी दिवे लागणीच्या वेळीच पाऊस आल्याने नागरिकांना फटाके फोडता आले नाहीत. तसेच, शुक्रवारीदेखील दुपारी शहरातील काही भागात जोरदार सरी बरसल्या. दरम्यान, २७ ऑक्टोबरपर्यंत शहराला यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.
यंदा परतीचा मान्सून जात नाही, तोच अवकाळी पावसाने राज्यात सर्वंत्र पुन्हा दाणादाण उडवून दिली. लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीजेच्या दिवशी नागरिकांना फटाके फोडण्याच्या आनंदाला मुकावे लागले. पुणे शहर परिसरातही गुरुवार आणि शुक्रवारी जोरदार पाऊस बरसला. सर्वाधिक पाऊस लोहगावमध्ये झाला. तेथे २४ तासांत ४०.२ मि.मी. पावसाची नोंद झाली. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने शहर परिसरात २७ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
लोहगाव (४०.४), शिवाजीनगर (१८.३), पाषाण (१७.८), चिंचवड (२४.५), लवळे (१९.५), कोरेगाव पार्क (२४.५).