पुणे

Pune : उड्डाणपुलाच्या कामासाठी घोरपडीत वाहतुकीत बदल

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे महापालिकेच्या वतीने पुणे – सोलापूर रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी घोरपडी परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे बी.टी. कवडे रस्ता, थोपटे चौक ते भारत फोर्स कंपनीकडे जाणारा रस्ता 6 ते 8 जानेवारी या दरम्यान सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. घोरपडीतील रेल्वे मार्गावरील गेटवर होणारी वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने पुणे-सोलापूर रेल्वे मार्ग आणि पुणे – मिरज रेल्वे मार्ग या दोन मार्गांवर दोन उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन केले आहे.

यातील पुणे – सोलापूर रेल्वे मार्गावरील काम सुरू आहे. या कामांतर्गत रेल्वे मार्गावर लोखंडाचे गर्डर टाकण्यात येणार आहे. यासाठी बी.टी .कवडे रस्ता, थोपटे चौक ते भारत फोर्स कंपनी कडे जाणारा रस्ता 6 ते 8 जानेवारी यादरम्यान सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान संपूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे या रस्त्याचा वापर करणार्‍या नागरिकांनी बी टी कवडे रस्त्यावरील स्मार्ट पॉईंट वनराज कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणजेच वठारे मळा रस्ता या पर्यायी मार्गाचा वापर करावा, पर्याय मार्ग हा केवळ दुचाकी किंवा हलक्या चार चाकी वाहनांसाठी उपलब्ध होणार आहे, असे पुणे महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT