Thunderstorm in Pune
पुणे : हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार गुरुवारी रात्री दहा पासून मुसळधार ते अति मुसळधार पावसाला शहरात सुरुवात झाली. प्रचंड विजांच्या कडकडाटासह पूर्वेकडून पश्चिमेकडे पावसाचा जोर जबरदस्त होता. त्यामुळे बहुतांश भागातील वीज गुल झाली. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसाचा जोर इतका होता की रस्त्यावरून जाणारी वाहतूक पूर्ण थांबली दूरवरचे काही दिसत नव्हते. नोकरीवरून घरी जाणारे अनेक जण या पावसामुळे अडकून पडले.
गेल्या दोन दिवसापासून हवामान विभागाने संपूर्ण राज्यात अति मुसळधार पावसाचा अंदाज दिला होता. त्याप्रमाणे 24 तासापूर्वीच शहरात आणि परिसरात तुफान पावसाला सुरुवात झाली. गुरुवारी रात्री दहा वाजता हलका पाऊस पडला पंधरा मिनिटानंतर तो पाऊस थांबला. छोटीशी सर येऊन गेली आहे असे वाटून अनेकांनी घरी जाण्याची वाट धरली. मात्र त्यानंतर अवघ्या दहा मिनिटातच प्रचंड विजांच्या कडकडाटासह अती मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले सर्वच रस्त्यांना पूर आल्याने समोरचे काही दिसत नव्हते. शहरातील सर्व पेठा आणि उपनगरांना या पावसाने सोडवून काढले भाऊ सुरू होताच दहा मिनिटातच बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडित झाला. रस्त्यात अडकलेल्या उत्तर रात्रीपर्यंत अडकून बसावे लागले.
हवामान विभागाने दिलेल्या इशारानुसार 13 ते 16 जून या तीन दिवसात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. संपूर्ण राज्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून पुणे शहर आणि परिसराला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी रेनकोट, छत्रीसह बाहेर पडावे. तसेच पाऊस पडताना झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर बोलू नये मोकळ्या मैदानात उभे राहू नये, सखल भागात जाताना सावध राहावे असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.