पुणे: पुणे,पिंपरी चिंचवड आणि संपूर्ण जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून संततधार सुरू असून रविवारी विक्रमी पावसाची नोंद झाली . रविवारी रात्री पावसाने संपूर्ण जिल्हा जलमय झाला. चिंचवड भागात 200 मी पाऊस झाल्याने त्या ठिकाणी घरात पाणी गेले.
शिवाजीनगरात सरासरी 116 मिनी पावसाची नोंद झाल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. जिल्ह्यात बहुतांश भागात ७० ते १०० मीमी तर काही भागात अत्यल्प पावसाची नोंद झाली आहे, एकूणच गेल्या पाच दिवसात महिना भराचा पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे, मात्र शहरात आणि ग्रामीण भागात झाडपडीने यंदा मोठे नुकसान केले आहे.
घाट माथ्यावर 24 तासात झालेला विक्रमी पाऊस (मिमी)
लोणावळा:670
भिरा:609
ताम्हिणी:580
शिरगाव:540
आंबोणे:537
खोपोली:516
कुंडले:290
भिवपुरी:266
खंड:305
निलशी:275
ठाकूरवाडी:115
वांगाव:207
कोयना:161
धारावी:125
शिरवटा:219
वलवण:442
लोणावळा:495
डोंगरवाडी:451
दावडी:474
मुळशी:230
पोफळी:190
पुणे जिल्हा :24 तासातील पाऊस (मिमी)
निमगिरी:१२१.५
माळीण:६३.५
भोर:५५.५
दापोडी:४३.५
राजगुरूनगर:४२.५
डुडूळगाव:३९
नारायणगाव:30
शिरूर:२२.५
लवळे:१५.५
हवेली:१४.५
तळेगाव:३.५
बारामती:३.४
दौंड:२.५
शहरात रविवारी रात्रीतून झालेला विक्रमी पाऊस (मिमी)
शिवाजीनगर:१०८.४
पाषाण:११३
लोहगाव:१४६.८
चिंचवड:२०६.५
एनडीए:९८.५