पुणे: ‘काय हा उकाडा ? हे आपले पुणेच आहे ना? अहो, सायंकाळी 6 वाजता आपलं शहर थंड होतं, पण रात्रीचे नऊ वाजले तरी घामाच्या धारा कमी होईना? हे संवाद रविवारी शहराच्या गल्लीबोळात ऐकायला मिळाले. रविवारी दि. 10 मे सारखा दिवस क्वचितच पुणेकरांनी पाहिला असावा, कारण प्रत्येक जण उकाड्याने त्रस्त होता. कमाल तापमान 40 ते 41 अंशांवर होते. मात्र, उकाडा 45 अंश तापमान एवढा जाणवत होता.
ऐरवी सायंकाळी 6 वाजता थंड होणारे पुणे रात्री 9 पर्यंत उष्ण झळांनी त्रस्त होते. त्यामुळे पुणेकर भयंकर उकाड्याने हैराण झालेले दिसत होते. शितपेयांच्या गाड्यांवर घोळक्याने गप्पा मारताना हे संवाद ऐकायला मिळाले. त्यामुळे दिवसभर रस्त्यांवर वर्दळ कमी होती. नागरिक सायंकाळी 6 वाजता बाहेर पडेल. पण, उष्ण झळांनी हैराण झाले होते. टेकड्यांवर फिरायला जाणाऱ्यांनी रात्री 7 नंतरच बाहेर पडणे पसंत केले.
रविवारचे कमाल, किमान तापमान..
शिवाजीनगर 40 (22), पाषाण 39 (23), लोहगाव 41 (25), चिंचवड 39 (25), लवळे 39 (23), मगरपट्टा 39 (26.4), एनडीए 38 (21), कोरेगाव पार्क 41 (25.3).
भयंकर उकाड्याचे कारण काय?
सध्या गुजरात आणि राजस्थानात उष्णतेची भयंकर लाट आहे. तसेच, दक्षिण भारतात पाऊस सुरू असल्याने दमट वारे येत आहे. या दोन्ही वाऱ्यांचा एकत्रित परिणाम शहरावर गत तीन दिवसांपासून दिसत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. रविवारी सकाळी 9 ते रात्री 7 पर्यंत उष्ण वारे शहरात वाहत होते. शहराचे कमाल तापमान 40 ते 41 अंशांवर स्थिर आहे. मात्र, किमान तापमान 25 ते 36 अंशांपर्यंत खाली गेले आहे. ढगाळ वातावरणामुळे शहरात उष्ण हवा कोंडली गेली. त्यामुळे रविवारी भंयकर उकाडा जाणवत आहे.पुणे तापले! 41 अंशांवर पारा, उकाड्याने नागरिक हैराण
गेले काही दिवस शहराचे तापमान कमी होते, ती प्रणाली आता बदलली आहे. आर्द्रता कमी झाली, वारा थांबला. त्यामुळे सूर्याची थेट किरणे शहरावर येत आहेत. उष्णता ट्रॅप झाली. त्यामुळे ती वर जाईना,असे वातावरण अजून दोन-तीन दिवस राहील.डॉ. एस. डी. सानप, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, आयएमडी, पुणे
पुण्याचे तापमान 41 अंशांवरच होते. ढगांमुळे उष्णता कोंडली गेली, वाऱ्याचा वेग कमी झाल्याने उष्मावर गेला नाही. किमान तापमान 21 ते 26 अंशांवर होते. त्यामुळे इतका उकाडा जाणवत होता.राजेश कपाडिया, संस्थापक, व्हॅगरीज ऑफ वेदर, मुंबई