Hadapsar Road Widening Pudhari
पुणे

Pune Hadapsar Road Widening: हडपसर टर्मिनल रस्त्याच्या रुंदीकरणाला गती

जागा ताब्यात घेण्यास सुरुवात; काही ठिकाणी न्यायालयीन अडथळे कायम

पुढारी वृत्तसेवा

पुणे: हडपसर रेल्वे टर्मिनलच्या कनेक्टिव्हिटीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रस्तारुंदीकरणाच्या कामाला वेग आला आहे. पुणे महापालिकेने या प्रकल्पासाठी विशेष पथक तैनात केले असून, प्रत्यक्ष जागा ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. टर्मिनलच्या दिशेने होणारा प्रवास सुसाट व्हावा, यासाठी आता महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे.

प्रशासकीय कारवाई आणि न्यायालयाची स्थगिती

महापालिकेने रस्तारुंदीकरणाच्या कामात येणारे अडथळे दूर करण्यास प्राधान्य दिले आहे. सद्य:स्थितीत जागा ताब्यात आलेल्या काही पट्‌‍ट्यांमध्ये रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले असून, वाहतूक काही प्रमाणात सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. मात्र, काही विशिष्ट ठिकाणच्या जमिनींबाबत न्यायालयातून स्थगिती आल्याने तेथे काम थांबले आहे. हा कायदेशीर पेच सोडविण्यासाठी महापालिकेचा विधी विभाग प्रयत्न करीत असून, उर्वरित भागात जागा ताब्यात घेण्याचे काम वेगाने सुरू आहे.

स्थानिकांची मागणी काय?

या प्रकल्पात स्थानिक नागरिकांचे हित जपण्यासाठी महापालिका अधिकारी आणि स्थानिक रहिवाशांमध्ये सातत्याने चर्चा सुरू आहे. रस्ते विकास आराखड्यानुसार हा रस्ता 30 मीटर रुंदीचा प्रस्तावित आहे. मात्र, येथील बांधकामे आणि रहिवाशांच्या सोयीचा विचार करून हा रस्ता 24 मीटर रुंद करण्याची मागणी स्थानिकांनी लावून धरली आहे. यावर मार्ग काढण्यासाठी प्रशासनाकडून चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत.

हडपसर रेल्वे टर्मिनलला जाणाऱ्या रस्त्यावरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली आहे. तसेच, यासाठी विशेष पथक तैनात केले आहे. काही ठिकाणी जागा ताब्यात आली असून, काही ठिकाणी स्थानिक नागरिक कोर्टात गेल्यामुळे न्यायालयातून स्थगिती आली आहे. ज्या ठिकाणी जागा ताब्यात आली तेथे डांबरीकरण केले आहे. काही नागरिकांकडून 30 मीटरचा प्रस्तावित असलेला रस्ता 24 मीटर करण्याचीही मागणी आहे.
राजेश बनकर, पथ विभागप्रमुख, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT