Pune Rainfall Record: एप्रिलमधला पुण्यात 130 वर्षांतील विक्रमी पाऊस

मान्सूनसारख्या पावसामुळे शहरात पूरस्थिती; रस्ते जलमय
Rain
RainPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरात एप्रिलमधील सरासरी पावसाचे प्रमाण 8 ते 16 मिलिमीटर इतकेच आहे. मात्र, गत सव्वाशे वर्षांचा एप्रिल महिन्यातील पावसाचा ताळेबंद तपासला, तर असे लक्षात येते की, या महिन्यात तो सतत सरासरीपेक्षा जास्तच झाला आहे. सर्वाधिक पाऊस 4 एप्रिल 1896 रोजी 51.1 मिमी इतका झाला होता. त्यानंतर तब्बल 130 वर्षांनी म्हणजे 2 एप्रिल 2026 रोजी शहरात 65 ते 107 मिमी पावसाची नोंद झाली.

Rain
Pune Vegetable Market Rates: पुणे मार्केट यार्डात भाज्यांच्या दरात घसरण

हवामान शास्त्रज्ञांच्या मते, एप्रिलमध्ये मान्सूनसारखी प्रणाली नाही, तरीही यंदा तो मान्सूनसारखा बरसला. कारण, शहरात हवेचे दाब हे 940 हेक्टा पास्कल इतके कमी होते. तर, राज्याच्या उर्वरित भागात ते 1003 ते 1005 इतके होते. त्यामुळे इतर भागांत तुलनेने कमी; मात्र पुण्यात सरासरी 65 ते 107 मिमी पाऊस झाला. अवघे शहर जलमय झाले अन्‌‍ पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या तुंबल्याने रस्त्यांना पूर आला. अनेक घरांत पाणी गेले. शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती.

Rain
Pune Fruit Market Rates: अवकाळीचा फटका; डाळिंबाचे दर घसरले, लिंबाला तेजी

1907 मध्ये महिनाभरात 70 मिमी

शहरात एप्रिलमध्ये झालेल्या पावसाची आकडेवारी हवामान विभागाच्या विविध संकेस्थळांवरून मिळाली. शंभरपेक्षा जास्त वर्षांची आकडेवारी तपासली असता असे लक्षात येते की, पुणे शहरात सर्वाधिक मोठा पाऊस हा 4 एप्रिल 1896 रोजी 51.1 मिमी झाला. त्यानंतर सातत्याने 10 ते 35 मिमी इतका झाला. एप्रिल 1907 मध्ये संपूर्ण महिनाभरात 70 मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news