Pune Graduate Constituency Smita Jadhav Support Pudhari
पुणे

Smita Jadhav: पुणे पदवीधर मतदारसंघात डॉ. स्मिताताई जाधव यांना मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांचा पाठिंबा

पदवीधरांच्या रोजगारासह व्यापार क्षेत्रातील प्रश्न सोडविण्याची अपेक्षा; विजयासाठी प्रयत्न करण्याचा व्यापाऱ्यांचा निर्धार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष-महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिताताई योगेश जाधव यांच्या पाठीशी गुलटेकडी मार्केट यार्डातील अन्‍नधान्य व्यापारी एकवटले आहेत. पदवीधरांच्या रोजगारासह व्यापार क्षेत्रातील वाढत्या अडचणी सोडविण्यासाठी डॉ. जाधव सक्षम प्रतिनिधित्व करतील, असा विश्वास व्यक्त करीत व्यापाऱ्यांनी त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार केला.

पुणे कृषी उत्त्पन्‍न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील गूळ-भुसार बाजारातील मे. चंद्रकांत हस्तीमल मुथा फर्ममध्ये व्यापाऱ्यांची बैठक पार पडली. या वेळी, दि पूना मर्चंटस् चेंबरचे माजी सचिव विजय मुथा, गणेश राठी, विजय ओस्तवाल, अनिल ओस्तवाल, सुनील शिंगवी, राजेंद्र भंडारी, गणेश शिंगवी, मुकुंद कलंत्री, नंदकुमार भळगट, दर्शन नहार यांच्यासह अन्‍नधान्य व्यापारी उपस्थित होते.

व्यापार क्षेत्रात नव्या पिढीचा सहभाग वाढत असून, तरुण व्यापाऱ्यांना व्यवसायवाढीसाठी प्रोत्साहन, आधुनिक सुविधा आणि शासनाच्या योजनांचा लाभ मिळणे आवश्यक आहे.

त्याचबरोबर उच्चशिक्षित तरुणांसाठी रोजगारनिर्मिती आणि पदवीधरांच्या प्रलंबित प्रश्नांना प्राधान्य मिळावे, अशी अपेक्षा बैठकीत व्यक्त करण्यात आली. डॉ. जाधव यांचा शैक्षणिक व प्रशासकीय अनुभव व्यापारी आणि पदवीधरांच्या प्रश्नांना विधानपरिषदेत वाचा फोडण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

मार्केट यार्डातील व्यापार क्षेत्रात तरुणांची संख्या वाढत आहे. मात्र, व्यवसाय करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तरुण व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्याबरोबरच पदवीधरांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणे गरजेचे आहे. डॉ. स्मिताताई जाधव या उच्चशिक्षित आणि अनुभवी असल्याने त्या व्यापारी व पदवीधरांचे प्रश्न विधानपरिषदेत प्रभावीपणे मांडतील. तसेच, तरुणांसाठी रोजगार निर्मिती करतील, असा विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार व्यापाऱ्यांनी केला आहे.
विजय मुथा, माजी सचिव, दि पूना मर्चंटस् चेंबर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT