Pune Graduate Constituency Election Pudhari
पुणे

Pune Graduate Constituency Election: पुणे पदवीधर निवडणुकीत डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयासाठी महायुतीचे सांघिक प्रयत्न; दत्तात्रय भरणे यांची ग्वाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार गावपातळीवर सूक्ष्म नियोजन; जिल्हा बँकेच्या संचालकांचाही पाठिंबा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव या शिक्षण क्षेत्रात गेली २५ वर्षे कार्यरत आहेत. डॉ. जाधव यांच्या विजयासाठी सांघिकपणे काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार महायुती म्हणून त्यांच्या विजयासाठी आम्ही सांघिक प्रयत्न करीत असल्याची माहिती कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते दत्तात्रय भरणे यांनी येथे दिली.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (पीडीसीसी) संचालक मंडळाच्या बैठकीसाठी सोमवारी (दि.१९) ते आले होते. या वेळी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी जिल्हा बँकेस सदिच्छा भेट दिली.

त्या वेळी बँकेचे ज्येष्ठ संचालक रमेश थोरात, माऊली दाभाडे यांच्या हस्ते पाटील यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांच्यासह संचालक रेवणनाथ दारवटकर, ॲड. संजय काळे, प्रवीण शिंदे, संभाजी होळकर, सुरेश घुले, भालचंद्र जगताप, रणजित तावरे, निर्मला जागडे, पूजा बुट्‌टे पाटील, दत्तात्रय येळे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शितोळे यांच्यासह सचिन ईटकर आदी उपस्थित होते.

महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून पदवीधर मतदारसंघासाठी पुणे जिल्ह्यात सूक्ष्म नियोजन करून गावपातळीपर्यंतचे सर्व मतदान होण्यासाठी सांघिकपणे काम करीत आहोत.

महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिताताई जाधव यांच्या विजयासाठी आम्ही सर्व जण सोबत असल्याची ग्वाही अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांच्यासह उपस्थित सर्वच संचालकांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT