Pune Gangwar Crime Pudhari
पुणे

Pune Gang War: पुण्यात पुन्हा टोळी युद्ध; आंदेकर हत्येचा बदला, आरोपीच्या भावावर गोळीबार करून कोयत्याने वार

vanraj andekar gangwar case: बालाजीनगर परिसरात सकाळीच तीन गोळ्या झाडल्या

पुढारी वृत्तसेवा

Pune Gangwar vanraj andekar case

पुणे: वनराज आंदेकर यांच्या खुनातील आरोपीच्या भावावर गोळीबार करून कोयत्याने वार करण्यात आले आहेत. अक्षय बापू मस्के उर्फ बाळा (वय 26 वर्ष राहणार सर्वे नंबर 25 स्वामी समर्थ मंदिराजवळ आंबेगाव पठार) असे त्याचे नाव आहे. अक्षय हा वनराज आंदेकर यांच्या खुनातील आरोपी आकाश मस्के यांचा भाऊ आहे.

बुधवारी सकाळी बालाजीनगर परिसरात घडली आहे. त्याच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, अक्षयला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

टोळी युद्धातून चौथी हत्या

वनराज आंदेकरची सप्टेंबर 2024 मध्ये पुण्यातील गणेश पेठ याठिकाणी हत्या करण्यात आली होती. यानंतर पुण्यातील टोळी युद्ध पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गेल्या वर्षभरात टोळी युद्धातून हत्येची ही चौथी घटना आहे.

पहिली घटना : 1 स्प्टेंबर 2024 वनराज आंदेकरची हत्या. आंदेकर हत्याप्रकरणात एकूण 22 आरोपी.

दुसरी घटना : सप्टेंबर 2025 गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरची पार्किंगमध्ये हत्या. गणेश कोमकर हा आंदेकर हत्याप्रकरणातील आरोपी.

तिसरी घटना : नोव्हेंबर 2025 आंदेकर हत्याप्रकरणातील आणखी एक आरोपी समीर काळेचा भाऊ गणेश काळेची हत्या.

चौथी घटना : 20 मे 2026 : आकाश मस्केचा भाऊ अक्षय मस्केची हत्या. आकाश हा देखील आंदेकर हत्याप्रकरणातील आरोपी.

पुण्यातील भररस्त्यात घडलेल्या या घटनेने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यात एका रिक्षाचालकावर कोयत्याने हल्ला करून पुलावरुन ढकलून देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यापाठोपाठ दिवसाढवळ्या रस्त्यावर गोळीबार झाल्याने गुंडावर पोलिसांचा धाक आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गोहर हसन यांनी पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली. 'बुधवारी सकाळी दहा वाजताची ही घटना असून मृताचे नाव अक्षय मस्के असे आहे. जुन्या वादातून ही हत्या झाली असून या घटनेचा तपास सुरू आहे', असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT