Ganesh Visarjan Pudhari
पुणे

Pune Ganesh Visarjan: पुणे विसर्जन मिरवणुकीची माहिती आता एका क्लिकवर!

मार्ग, वाहतूक बदल, पर्यायी रस्ते, पार्किंगसह गणपती मंडळांचे लोकेशन मिळणार; ४० मंडळांना जीपीएस ट्रॅकर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी नागरिकांच्या सोयीसाठी विशेष ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. diversion.punepolice.gov.in या संकेतस्‍थळावर विसर्जन मिरवणुकीचे मार्ग, वाहतूक बदल, पर्यायी रस्ते, पार्किंग तसेच प्रमुख गणपतींच्या मिरवणुकीची अद्ययावत माहिती मिळणार आहे. मानाच्या गणपतींसह प्रमुख गणेश मंडळांच्या मिरवणुका सध्या कोणत्या ठिकाणी आहेत, त्यांची दिशा काय आहे, तसेच मिरवणुकीचे पुढील व शेवटचे टोक कुठे आहे, याची माहितीही वेबसाईटवर मिळणार आहे.

बंद केलेले, वळविलेले आणि पुन्हा खुले केलेले रस्ते परिस्थितीनुसार अपडेट केले जातील. पालखी सोहळ्यादरम्यान या वेबसाईटला सुमारे २ कोटी ७ लाख हिट्स मिळाल्या होत्या. यंदाही नागरिकांना एकाच ठिकाणी वाहतूकविषयक माहिती मिळावी, यासाठी ही सुविधा सुरू केली आहे.

पुणे पोलिसांनी गुगल मॅपसोबत समन्वय साधला असून, विसर्जन मिरवणुकीदरम्यान बंद व खुले होणारे रस्ते गुगल मॅपवरही दिसणार आहेत. नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी वेबसाईटवरील अद्ययावत माहिती तपासावी, असे आवाहन अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी केले आहे.

40 मंडळांना जीपीएस टॅकर

विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या 40 मंडळांना जीपीएस ट्रॅकर लावण्यात आले आहे. त्‍याद्वारे कोणते मंडळ कोठे असणार आहे. ही माहिती एका क्लिकवर पुणे पोलिसांना मिळणार असून, त्‍यामुळे नियोजनात अधिकची सुसूत्रता आणण्यास अधिक मदत होणार आहे. तर संपूर्ण शहरात एकूण 4 हजार 170 मंडळे आहेत. त्‍यापैकी राजिस्‍टर मंडळांची संख्या 2 हजार 378 आहे. तर अद्यापही 1 हजार 782 मंडळे ही रजिस्‍टर नसल्‍याचे पोलिसांनी सांगितले.

... या रस्‍त्‍यावरून इतकी मंडळे होणार दाखल

  • लक्ष्मी रस्‍ता - 220

  • कुमठेकर रस्‍ता -160

  • केळकर रस्‍ता- 78

  • टिळक रस्‍ता - 204

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT