Pune Ganesh Visarjan Bus Routes Pudhari
पुणे

Pune Ganesh Visarjan Bus Routes: गणेश विसर्जनासाठी पुण्यात बससेवा बदलली! स्वारगेट-डेक्कनहून बस कुठून सुटणार? पाहा संपूर्ण यादी

- कात्रजकडे जाणार्‍या बस लक्ष्मी नारायण चौकातून, तर सिंहगड रोडच्या बस पर्वती पायथ्याहून सुटणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे शुक्रवारी स्वारगेट आणि डेक्कन चौक परिसरातील वाहतूक बंद राहणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएल) स्वारगेट येथील शाहू महाराज बसस्थानकातून सातारा रोडमार्गे कात्रज, कोंढवा, अप्पर आणि मार्केट यार्डकडे जाणार्‍या बस लक्ष्मी नारायण चौकातून, तर नटराज बसस्थानकातून सिंहगड रोडकडे जाणार्‍या बस पर्वती पायथा येथील स्वामी समर्थ मठ बसथांब्यावरून सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

स्वारगेट स्थानकाबाहेरून सोलापूर रोडमार्गे पुलगेट आणि हडपसरकडे जाणार्‍या बस सुटण्याचे ठिकाणही बदलले आहे. या बस स्वारगेट डेपोजवळील वेगा सेंटर येथून सुटतील. तसेच काही बस सुटण्याची ठिकाणे एका दिवसासाठी तात्पुरती बदलली असून, प्रवाशांनी नेहमीच्या बसस्थानकात न जाता प्रवाशांनी आपल्या मार्गानुसार बदललेले ठिकाण गाठावे, असे आवाहन पीएमपीएल प्रशासनाने केले आहे.

भवानी पेठ, नाना पेठ आणि रास्ता पेठकडे जाणार्‍या बसही याच ठिकाणाहून सुटणार आहेत. त्यामुळे स्वारगेट परिसरातून बस पकडणार्‍या प्रवाशांनी आपल्या इच्छित मार्गानुसार लक्ष्मी नारायण चौक, पर्वती पायथा किंवा वेगा सेंटर यापैकी योग्य ठिकाणी जावे.

डेक्कन जिमखाना बसस्थानकातून कोथरूड डेपो, माळवाडी आणि एनडीए गेटकडे जाणार्‍या बस एसएनडीटी कॉलेजजवळून सुटतील. या मार्गांवरील प्रवाशांनी नेहमीच्या डेक्कन जिमखाना बसस्थानकाऐवजी तात्पुरत्या ठिकाणाची नोंद घ्यावी.

विसर्जनाच्या दिवशी शिवाजी रोड, बाजीराव रोड, लक्ष्मी रोड, टिळक रोड आणि कर्वे रोड हे प्रमुख रस्ते बस वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. त्यामुळे शहरातून प्रवास करणार्‍यांनी घराबाहेर पडण्यापूर्वी आपली बस नेमकी कोठून सुटणार आहे, हे वरील बदलांनुसार प्रवास करावा, असे आवाहन पीएमपीएल प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT