

Shri Ram Mitra Mandal Trust: गणरायाच्या आगमनाने संपूर्ण महाराष्ट्रात भक्ती, उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते. याच उत्साहाला सामाजिक कार्याची जोड देत केशवनगर, मुंढवा येथील श्रीराम मित्र मंडळ ट्रस्ट गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आहे. यंदा मंडळाने आपल्या वाटचालीच्या २९व्या वर्षात पदार्पण केले असून गणेशोत्सवासोबतच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांची परंपरा कायम ठेवली आहे.
सन १९९७ मध्ये काही उत्साही तरुणांनी एकत्र येत श्रीराम मित्र मंडळाची स्थापना केली. सुरुवातीला परिसरातील नागरिकांच्या सहभागातून साध्या पद्धतीने सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. मात्र, गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजाला एकत्र आणणारा आणि समाजोपयोगी कार्याला चालना देणारा उत्सव असावा, अशी मंडळाच्या कार्यकर्त्यांची भूमिका होती.
‘एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ हे ब्रीदवाक्य घेऊन मंडळाची वाटचाल सुरू झाली. गेल्या २९ वर्षांत कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे आणि परिसरातील नागरिकांच्या सहकार्यामुळे या छोट्याशा रोपट्याचे रूपांतर मोठ्या वटवृक्षात झाले आहे.
श्रीराम मित्र मंडळ ट्रस्टने सार्वजनिक गणेशोत्सवाला सामाजिक कार्याची जोड दिली आहे. समाजातील एकोपा, संस्कृतीचे संवर्धन आणि सेवाभाव या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून मंडळ विविध उपक्रम राबवत आहे.
मंडळाकडून वेळोवेळी रक्तदान शिबिरे, मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आणि नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाते. या उपक्रमांमुळे परिसरातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध झाली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी दिली जाते. नृत्य, संगीत आणि पारंपरिक कला यांसह विविध स्पर्धांमधून लहान मुले, तरुण आणि नागरिकांचा सहभाग वाढवला जातो. त्यामुळे नवीन पिढीला आपल्या संस्कृतीशी जोडण्याचे काम मंडळाच्या माध्यमातून केले जाते.
श्रीराम मित्र मंडळ ट्रस्टच्या कार्याचे वैशिष्ट्य म्हणजे परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण मंडळाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात. त्यामुळे गणेशोत्सव हा केवळ मंडळाचा कार्यक्रम न राहता संपूर्ण परिसराचा उत्सव बनला आहे.
सामाजिक कार्य करणे हे सोपे नसते. त्यासाठी इच्छाशक्ती, निष्ठा, अथक परिश्रम, त्याग आणि निरपेक्ष भावनेची गरज असते. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या मूल्यांच्या आधारावर गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्याची परंपरा जपली आहे.
यंदा श्रीराम मित्र मंडळ ट्रस्ट आपल्या २९व्या वर्षात पदार्पण करत आहे. मागील वर्षांच्या कार्याचा आढावा घेताना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नागरिक, वर्गणीदार, हितचिंतक आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजातील एकोपा वाढवणे, सामाजिक उपक्रमांना चालना देणे आणि संस्कृतीची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे, हा मंडळाचा प्रयत्न आहे. भविष्यातही आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि सांस्कृतिक क्षेत्रात अधिक व्यापक स्वरूपात काम करण्याचा मंडळाचा मानस आहे.
आज श्रीराम मित्र मंडळ ट्रस्ट हे केवळ गणेशोत्सव साजरे करणारे मंडळ न राहता समाजाच्या प्रगतीसाठी काम करणारे एक कुटुंब म्हणून परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे.
अध्यक्ष : श्री. पांडुरंग शिंदे
उपाध्यक्ष : श्री. विकास मोरे
कार्याध्यक्ष : मिलिंद गोरे, परमानंद लगळी, अभिजित सिद्ध
खजिनदार : मयुर दोमाले, अक्षय शिंदे, प्रकाश सुतार
सचिव : मनोज दोमाले, अजिंक्य गायकवाड, राजू खताळे
उपकार्याध्यक्ष : सागर भोसले, आशिव जाधव, आतिश कांबळे
सहखजिनदार : विपुल साकोरे, आतिव शिंदे, अमित भोसले
उपसचिव : अमृत कांबळे, गोबिंद सिंह, अभिषेक देसाई
प्रदीप भंडारी, गणेश आवारे, सौरभ टापरे, शुभम भोसले, वेदांत कांबळे, सुदर्शन टापरे, सचितानंद राजगुरु, विवेकानंद राजगुरु, अभिषेक भंडारी, अनिस पटेल, महेश आवारे, आदित्य भिसे, सुदर्शन राजगुरु, सोहम बोरुळे, आकाश गायकवाड, विकास निमकर, श्रेयश नरके आणि आर्यन पाटसुते.