Fish  Pudhari
पुणे

Pune Fish Market Prices: थंडीचा फटका; गणेश पेठेत मासळीचे दर १० टक्क्यांनी वाढले

मासळीची आवक घटली; चिकन व अंडी मात्र स्वस्त

पुढारी वृत्तसेवा

पुणे: देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीहून गणेश पेठ येथील मासळी बाजारात मासळी दाखल होत आहे. कडाक्याच्या थंडीचा परिणाम मासेमारीवर झाला आहे. मागणीच्या तुलनेत कमी प्रमाणात मासळी बाजारात दाखल होत असल्याने सर्व प्रकारच्या मासळीच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. उन्हाचा चटका वाढल्यानंतर मासळीची आवक बाजारात वाढेल, अशी शक्यता विक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात आली.

मासळीचे दर तेजीत असले तरी मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढल्याने चिकनसह गावरना अंडीच्या दरात घसरण झाली आहे. चिकन किलोमागे वीस रुपये तर गावरान अंडी शंभर रुपयांनी स्वस्त झाली. इंग्लिश अंडी आणि मटणाचे दर स्थिर राहिल्याचे सांगण्यात आले. रविवारी (दि. 1) खोल समुद्रातील मासळी 10 ते 15 टन, खाडीच्या मासळीची सुमारे 200 ते 250 किलो आणि नदीच्या मासळीची 200 ते 400 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे 20 ते 25 टन इतकी आवक झाली होती.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):

पापलेट : कापरी : 2200-2400, मोठे : 1800-2000, मध्यम : 1400-1500, लहान : 1000-1200, भिला : 900-1000, हलवा : 700-800, सुरमई 800-1200, रावस : 900-1200, घोळ : 900-1000, करली : 300-400, करंदी : 450-500, भिंग : 400-500, पाला : 1000-1400, वाम : पिवळी 1000-1200, काळी : 300-400, ओले बोंबील : 400-500. कोळंबी : लहान : 200-320, मोठी : 700-800, जम्बो प्रॉन्स : 1500, किंग प्रॉन्स : 900-1000, लॉबस्टर : 2000-2200, मोरी : 300-400, मांदेली : 100-160, राणीमासा : 250-360, खेकडे : 300-400, चिंबोऱ्या : 700-800. खाडीची मासळी - सौंदाळे : 250-360, खापी : 250-360, नगली : 500-600, तांबोशी : 500-600, पालू : 250-300, लेपा : 300-400, बांगडा : 250-300, शेवटे : 250-300, पेडवी : 150-200, बेळुंजी : 150-200, तिसऱ्या : 300-350, खुबे : 100-150, तारली : 200-250. नदीतील मासळी : रहू : 160-180, कतला : 200-220, मरळ : 400-450, शिवडा : 200-250, खवली : 200-250, आम्ळी : 120-160, खेकडे : 250-400, चिलापी : 80-150, वाम : 550-600. मटण : बोकडाचे 800, बोलाईचे 800, खिमा 800, कलेजी 840. चिकन 250, लेगपीस 320, जिवंत कोंबडी 180, बोनलेस 350. अंडी : गावरान (शेकडा) 1300 डझन 168, प्रतिनग 14. इंग्लिश (शेकडा) 570, डझन 78, प्रतिनग 6.50.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT