पुण्यातील वाहतुकीत बदल Pudhari
पुणे

Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल, बंद मार्ग आणि पर्यायी मार्ग वाचा

गणेश चतुर्थीनिमित्त बुधवारी (27 ऑगस्ट) मध्यभागातील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

पुणे : गणेश चतुर्थीनिमित्त बुधवारी (27 ऑगस्ट) मध्यभागातील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. शिवाजी नगर येथील डेंगळे पूल, कसबा पेठेतील फडके हौद चौक ते जिजामाता चौक, फुटका बुरूज, अप्पा बळवंत चौक ते हुतात्मा चौक (बुधवार चौक), मोती चौक, मंगला चित्रपटगृहासमोरील रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. मुंढव्यातील केशवनगर परिसरात मूर्तीखरेदीसाठी भाविकांची गर्दी होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (26 ऑगस्ट) या भागात वाहतूक बदल करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक पर्याची मार्गाने जाणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली. (Latest Pune News)

बंद मार्ग आणि पर्यायी मार्ग...

  • छत्रपती शिवाजी रस्त्यावरील गाडगीळ पुतळा चौक ते मंडईतील गोटीराम भैया चौक हा मार्ग वाहतुकीस

  • बंद असणार आहे. वाहनांनी संताजी घोरपडे पथ, कुंभारवेस चौक, मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौक यामार्गाने जावे.

  • जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी पुतळा चौक, खुडे चौकमार्गे कुंभारवाड्याकडे जाणार्‍या वाहनांनी छत्रपती शिवाजी पुलावरून डावीकडे वळून संताजी घोरपडे मार्गाने कुंभारवेसकडे जावे.

  • सारसबाग परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ केंद्र परिसरात सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. वाहनचालकांनी मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझा, नीलायम चित्रपटगृहाजवळ वाहने लावावीत.

पीएमपी बसमार्गात बदल

शिवाजीनगर बसस्थानकातून स्वारगेटकडे जाणार्‍या पीएमपी बसमार्गात बदल करण्यात आला आहे. शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाणार्‍या पीएमपी बस स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे), जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना, टिळक रस्तामार्गे स्वारगेटकडे जातील. महापालिका भवन परिसरातून स्वारगेटकडे जाणार्‍या पीएमपी बस जंगली महाराज रस्त्याने जातील.

मूर्ती खरेदीसाठी पार्किंगव्यवस्था

कामगार पुतळा चौक ते छत्रपती शिवाजी पुतळा-संताजी घोरपडे पथ ते गाडगीळ पुतळा-टिळक पूल ते भिडे पूल, नदीपात्रातील रस्ता-मंडईतील वाहनतळ-छत्रपती शिवाजी रस्त्यावरील शाहू चौक ते राष्ट्रभूषण चौक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT