Jujube Pudhari
पुणे

Pune Fruit Market: पुण्यात बोरांचे दर २० ते ३० टक्क्यांनी वाढले; डाळिंब स्वस्त

तुळशी विवाहामुळे बोरांना मागणी वाढली; दुष्काळामुळे आवक घटली, सीताफळाचे दरही वधारले

पुढारी वृत्तसेवा

पुणे: तुळशीच्या लग्नास सुरुवात झाल्याने बाजारात चेकनट, चमेली या बोरांना मागणी वाढली आहे. दुष्काळामुळे उत्पादन रोडावल्याने गतवर्षीच्या तुलनेत वीस ते तीस टक्के माल बाजारात दाखल होत आहे. त्यातुलनेत मागणी अधिक असल्याने दरात वीस ते तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. मंगळवारी (दि. २४) विवाह समाप्तीपर्यंत बोरांना मागणी आणि दर टिकून राहतील, अशी माहिती बोरांचे व्यापारी नितीन कुंजीर यांनी दिली.

फळबाजारात डाळिंबाची आवक मोठ्या प्रमाणात झाली. त्यातुलनेत मागणी कमी राहिल्याने डाळिंबाच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली. याउलट सीताफळाला मागणी चांगली राहिल्याने त्याच्या भावात वाढ झाली. उर्वरित सर्व फळांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

रविवारी लिंबाची ७०० ते ८०० गोणी, मोसंबी ५० ते ६० टन, संत्री ६० ते ७० टन, डाळिंब ३५ ते ४० टन, पपई ९ ते १० टेम्पो, कलिंगड ९ ते १० गाड्या, खरबूज ९ ते १० टेम्पो आणि अननसाची ६ ट्रक आवक झाली.

फळांचे घाऊक भाव (रुपयांत) : लिंबू (प्रतिगोणी) : ३००-१२००, मोसंबी (३ डझन) : १४०-३२०, मोसंबी (४ डझन) : ६०-१८०, संत्रा (१० किलो) : २००-९००, डाळिंब (प्रतिकिलो) : भगवा ४०-१५०, आरक्ता २०-५०, गणेश १०-४०, कलिंगड (प्रतिकिलो) : १२-१५, खरबूज (प्रतिकिलो) : ३०-४०,

पपई (प्रतिकिलो) : १२-२५, चिक्कू (१० किलो) : १००-६००, पेरू (२० किलो) : ४००-५००, अननस (एक डझन) : ३००-९००, सीताफळ (प्रतिकिलो) : २०-१५०, ड्रॅगन फ्रूट (प्रतिकिलो) : २०-१००, बोरे (१० किलो) चमेली : ४५०-५००, उमराण : १८०-२२०, चेकनट : ११००-१२००, चण्यामण्या : ८००-९००.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT