पुणे : नवरात्रोत्सवात भाविक मोठ्या प्रमाणात उपवास करतात. या पार्श्वभूमीवर गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात फळांना मागणी होत होती. मात्र, रविवारी मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावल्याने सकाळच्या सुमारास खरेदीदार खरेदीसाठी बाहेर पडले नाही. परिणामी, मागणी अभावी कलिंगड, खरबूज, लिंबू, संत्रा आणि मोसंबीच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी घसरण झाली. तर, आवक कमी पडल्याने पपईच्या भावात मात्र किलोमागे पाच रुपयांनी वाढ झाली होती.(Latest Pune News)
गुलटेकडी येथील मार्केट यार्ड येथील फळबाजारात रविवारी (दि. 28) फळबाजारात मोसंबी 80 ते 90 टन, संत्रा 22 ते 25 टन, डाळिंब 80 ते 100 टन, पपई 7 ते 8 टेम्पो, लिंबाची सुमारे 600 ते 800 गोणी, किंलगड 2 ते 3 टेम्पो , खरबूज 1 ते 2 टेम्पो, चिक्कू 100 ते 600 गोणी, पेरु 500 ते 600 क्रेट, अननस 4 ट्रक, बोरे 20 ते 25 पोती, सफरचंद 7 ते 8 हजार बॉक्स तर सिताफळाची 25 ते 30 टन इतकी आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे -लिंबे (प्रतिगोणी) : 150-500, मोसंबी : (3 डझन) : 120-240, (4 डझन) : 30-90, संत्रा : (10 किलो) : 150-600, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 50-150, आरक्ता : 10-50, गणेश : 5-25, किंलगड : 7-12, खरबूज : 20-30, पपई : 12-30, चिक्कू (दहा किलो) : 100-600, पेरु (20 किलो) : 300-500, अननस (1 डझन): 100-600, सिताफळ (1 किलो) : 15-100, बोरे (10 किलो) : चमेली 220-270, चेकनट 600-800, उमराण 80-120, चण्यामण्या 600-750. सफरचंद (22 ते 25 किलो) : 1000-2200.
कलिंगड, खरबूज, लिंबू, संत्रा, मोसंबी स्वस्त; पपई महाग
फळबाजारात विक्रीसाठी दाखल झालेली मोसंबी.