Watermelon Pudhari
पुणे

Pune Fruit Market Rates: पुणे फळबाजारात दर घसरले; रमजाननंतर मागणी कमी

कलिंगड-खरबूज स्वस्त; लिंबू, द्राक्षांवरही परिणाम, आवक जास्त असल्याने भाव कमी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मुस्लिम धर्मियांचा रमजानचा महिना संपल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात कलिंगड, खरबूज, पपई आदी फळांच्या मागणीत मोठी घट झाली आहे. मात्र, उन्हाच्या कडाक्यामुळे काहीअंशी या फळांना मागणी कायम आहे.

मात्र, त्यातुलनेत आवक जास्त असल्याने त्यांच्या दरात किलोमागे दोन रुपयांनी घसरण झाली आहे. अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने द्राक्षांच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. बाजारात पावसाचा मार बसलेल्या द्राक्षांच्या तुलनेत दर्जेदार द्राक्षांना चांगले दर मिळत आहे.

आखातातील युद्धपरिस्थितीमुळे व्यावसायिक गॅसपुरवठा विस्कळीत झाल्याने शहरातील हॉटेल-खानावळींमधील अनेक खाद्यपदार्थांवर मर्यादा आल्या आहेत. परिणामी, येथून होणाऱ्या लिंबाच्या मागणीतील घट कायम आहे. गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी 15 ते 20 किलोच्या एक हजार गोण्यांची आवक झाली. एकीकडे उन्हामुळे लिंबाची आवक निम्म्यावर आली असताना दुसरीकडे मागणीही घटल्याने ऐन उन्हाळ्यात लिंबाच्या भावात गोणीमागे पन्नास ते शंभर रुपयांनी घसरण झाली आहे.

नव्या हंगामातील डाळिंबाची आवक वाढत असून त्यामध्ये जवळपास 60 टक्क्यांहून अधिक माल हिरवा आहे. याखेरीज, बांधावरूनच मोठ्या प्रमाणात खरेदी वाढल्याने मार्केट यार्डातील आवक घटली आहे.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) :

500-1500, मोसंबी : (3 डझन) : 120-320, (4 डझन) : 50-110, संत्रा : (10 किलो) : 400-1500, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 60-200, आरक्ता : 10-60, गणेश : 10-30, कलिंगड : 5-13, खरबूज : 10-25, पपई : 5-15, चिक्कू (दहा किलो) : 150-300, पेरु (2 किलो) : 700-800, अननस (1 डझन): 100-600, पेरु : रेड डायमंड (10 किलो) 700-1100, पिंक पेरू (10 किलो) : 300-700, अननस (1 डझन): 100-600. द्राक्षे : (15 किलो) : सुपर सोनाका 500-1200, सोनाका 500-1200, जम्बो (10 किलो) 500-1200, माणिकचमन आणि तास-ए-गणेश (15 किलो) : 500-1200, स्ट्रॉबेरी (2 किलो) 200-300, हापूस (4 ते 7 डझन) कच्चा 8000-12000.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT