Lemon Pudhari
पुणे

Pune Fruit Market: पुणे फळबाजारात लिंबाचे भाव घसरले; रमजान व उन्हामुळे रसदार फळांना मागणी

व्यावसायिक गॅस तुटवड्यामुळे हॉटेलमधील मागणी कमी; कलिंगड, खरबूज, द्राक्षे, पपई यांची बाजारात जोरदार विक्री

पुढारी वृत्तसेवा

पुणे: आखातातील युद्ध परिस्थितीमुळे व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने शहरातील हॉटेल-खानावळींमधील अनेक खाद्यपदार्थांवर मर्यादा आल्या आहेत. परिणामी, येथून होणाऱ्या लिंबाच्या मागणीत मोठी घट झाली आहे. गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी 15 ते 20 किलोच्या एक हजार गोण्यांची आवक झाली. एकीकडे उन्हामुळे लिंबाची आवक निम्म्यावर आली असताना दुसरीकडे मागणीही घटल्याने ऐन उन्हाळ्यात लिंबाच्या भावात गोणीमागे दोनशे रुपयांनी घसरण झाली आहे.

मुस्लिम धर्मीयांचा रमजानचा महिना आणि उन्हाच्या कडाक्यामुळे बाजारात कलिंगड, खरबूज, पपई, द्राक्षे आदी रसदार फळांना मागणी टिकून आहे. बाजारातील बहुतांश फळांची आवक-जावक कायम असल्याने त्यांचे गत आठवड्यातील दर ‌‘जैसे थे‌’ आहेत. फळबाजारात रविवारी (दि. 15) मोसंबीची 25 ते 30 टन, संत्रा 15 ते 20 टन, डाळिंब 20 ते 25 टन, पपई 15 ते 20 टेम्पो, लिंबाची सुमारे 800 ते 1 हजार गोणी, कलिंगड 90 ते 100 टेम्पो, खरबूज 70 ते 80 गाड्या, चिकू 2 हजार गोणी, पेरू 150 ते 200 क्रेट, अननस 6 ट्रक आणि द्राक्षांची 40 ते 45 टन इतकी आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे:

लिंबे (प्रतिगोणी) : 1200-2000, मोसंबी : (3 डझन) : 210-420, (4 डझन) : 80-200, संत्रा : (10 किलो) : 500-1400, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 70-200, आरक्ता : 10-50, गणेश : 10-30, कलिंगड : 8-18, खरबूज : 10-22, पपई : 15-20, चिकू (दहा किलो) : 100-600, पेरु (20 किलो) : 700-800, अननस (1 डझन): 100-600, द्राक्षे : (15 किलो) : सुपर सोनाका 900-1300, सोनाका 800-1200.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT